कारचे सेन्सर्स रिव्हर्ससाठी किती उपयोगाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 02:57 PM2017-09-08T14:57:17+5:302017-09-11T12:48:25+5:30

कार रिव्हर्स घेताना मागील स्थितीचा अंदाज येण्यासाठी सेन्सर्स या इलेक्ट्रॉनिक साधनाचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. अर्थात याचा वापर पूर्णपणे करतानाच ड्रायव्हरने आपले कौशल्य व त्यासाठी अन्य एखाद्या व्यक्तीचे घेतलेले मार्गदर्शनही प्रभावी असते, हे विसरता कामा नये.

Usefulness of Car Sensors while taking Reverse | कारचे सेन्सर्स रिव्हर्ससाठी किती उपयोगाचे

कारचे सेन्सर्स रिव्हर्ससाठी किती उपयोगाचे

Next
ठळक मुद्देएकंदर तीन सेन्सर्स कारच्या मागे बंपरमध्ये बसवले जातातकार मागे घेताना कुठे आपटणार नाही याचा अंदाज सेन्सर्सद्वारे दिला जातोड्रायव्हरला त्याचा खूप उपयोग होतो, त्यामुळे कारचे संभाव्य नुकसान टळले जाऊ शकते

आधुनिक काळात कारला विविध प्रकारचे सेन्सर्स बसवण्यात येऊ लागले आणि त्यामुळे एकंदर कारच्या वापरामध्येही आमूलाग्र बदल झाल्याचे दिसून येत आहे. कार रिव्हर्स म्हणजे मागे घेताना ड्रायव्हरला अचूक अंदाज यावा यासाठी सेन्सर्सचा वापर होत आहे. काही कार उत्पादक ते कार ग्राहकाला कार विकत घेतानाच ती सुविधा देऊ करतात तर ज्या कारना कार उत्पादक तशी सुविधा देत नाहीत, त्यांना बाजारातून तसे सेन्सर्स हवे असतील तर बसवून घेतात. कार रिव्हर्स सेन्सर्सचा हा वापर आता अनेकजण करू लागले आहेत.

नेमके हे सेन्सर्स कसे काम करतात ते पाहाण्यासारखे आहे. एकंदर तीन सेन्सर्स कारच्या मागे बंपरमध्ये बसवले जातात. त्या सेन्सर्सद्वारे साधारण १० फुटांपर्यंत मागच्या बाजूला काही अडथळा असेल तर तो अंदाजित केला जातो. कार ड्रायव्हरच्या आरशामध्ये वा अन्य जागी विशिष्ट पद्धतीने त्या सेन्सर्सद्वारे अंदाजित केलेल्या अडथळ्याचा अंदाज कार मागे घेताना येऊ शकतो.

अशा प्रकारचे सेन्सर्स हे कार मागे घेताना कार मागे कुठे मोठ्या दगडावर, कट्ट्यावर,डिव्हायडरवर आपटणार नाही, याचा अंदाज सेन्सर्सद्वारे दिला जातो. ड्रायव्हरला त्याचा खूप उपयोग होतो, हे नक्कीच पण त्यामुळे कारचे संभाव्य नुकसान टळले जाऊ शकते. एखादा छोटा मुलगा वा मुलगी मागे असेल तरीही त्याचा अंदाज येतो, जी बाब कारच्या ड्रायव्हरला मागच्या काचेतून वा आरशामधून दिसू शकत नाही, त्याचा अंदाज या सेन्सर्सद्वारे अंदाजित करता येते. या सेन्सर्सचा हा फायदा नव्या चालकाने नक्कीच घ्यावा, जुन्या चालकांनाही त्याचा वापर करणे खूप सोयीचे होत असते. पण हे करताना आपले कौशल्य कमी होत नाही याचाही अंदाज चालकांनी घेतला पाहिजे.

अनेकदा कायम स्वरूपी या प्रकारच्या सेन्सर्सवर अवलंबून राहाण्याच्या सवयीने कार मागे घेताना प्रत्येक बाबींचा अंदाज येतोच असे नाही. तसेच काहीवेळा सेन्सर्स काम करीत नसल्यास ड्रायव्हरची पंचाईत होते. साईड मिररमधून कार मागे घेताना घेतल्या जाणाऱ्या अंदाजासाठी हे सेन्सर्स अधिक उपयुक्त ठरत असले तरी कार मागे घेण्याचे कौशल्य मात्र सेन्सर्समुळे कमी होत नाही ना,आपण पूर्णपणे त्यावर अवलंबून नाही ना, याचाही विचार करा ड्रायव्रने करायला हवा.अन्यथा पूर्णपणे सेन्सर्सवर अवलंबून राहाणेही योग्य ठरणार नाही.

शेवटी इलेक्ट्रॉनिक सुविधेवर किती अवलंबून राहायच तेही माणसाने ठरवायला हवे. काहीवेळा माणसाचा सेन्स हा या सेन्सर्सपेक्षाही अधिक चांगला असू शकतो, आणि तो सेन्स घालवायचा नसला तर सेन्सर्सचा वापर ठीक आहे पण त्यावर पूर्ण अवलंबून राहाण्यापेक्षा योग्य मार्गदर्शनही काही वेळा गरजेचे असते. शेवटी सेन्सर्सने मिळणारा सेन्स आणि माणसाच्या कौशल्यामुळे व अन्य कोणा व्यक्तीच्या मार्गदर्शनामुळे मिळणारा सेन्स हा नक्कीतच अधिक प्रभावीही ठरू शकतो.

 

Web Title: Usefulness of Car Sensors while taking Reverse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.