आयएसआय मार्क नसलेले हेल्मेट वापरताय, सावधान...!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 09:24 AM2018-08-07T09:24:14+5:302018-08-07T09:26:34+5:30

वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्या वाहन चालकांना जरब बसवण्यासाठी वाहतूक विभागाने कंबर कसली आहे.

using non ISI mark helmets...be careful...! | आयएसआय मार्क नसलेले हेल्मेट वापरताय, सावधान...!

आयएसआय मार्क नसलेले हेल्मेट वापरताय, सावधान...!

googlenewsNext
ठळक मुद्देवापरणाऱ्यास व विक्रेत्यास दोन वर्षांची शिक्षा किंवा दोन लाख रुपयांचा दंड

नवी दिल्ली : वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्या वाहन चालकांना जरब बसवण्यासाठी वर्षभरापूर्वीच दंडामध्ये जबर वाढ केलेली असताना आता आयएसआय मार्क नसणारी हेल्मेट वापरणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात वाहतूक विभागाने मोर्चा वळविला आहे. आयएसआय मार्क नसलेली हेल्मेट वापरल्यास व विक्री केल्यास दोन वर्षांची शिक्षा किंवा दोन लाख रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. पुढील 60 दिवसांनंतर हा नवा  नियम लागू हाेणार आहे.
रस्ते सुरक्षा अिभयानांतगर्त वाहतूक विभागाकडून नेहमीच हेल्मेट वापरण्यासंबंधी जागृती करण्यात येते. बऱ्याचदा हेल्मेट सक्तीही करण्यात आली आहे. मात्र, तरीही बरेच दुचाकीस्वार सुरक्षेबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. वाहतूक पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी रस्त्याकडेला मिळणारी हलक्या दर्जाची हेल्मेट खरेदी करतात व वापरतात. या हेल्मेटमुळे अपघातावेळी कोणतेही संरक्षण मिळत नसल्याने रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसुचना जारी केली आहे. यामध्ये अदखलपात्र गुन्हा आणि  दोन वर्षांचा तुरुंगवास किंवा दोन लाख रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तसेच पुन्हा असा गुन्हा केल्यास वाढीव दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. 
 भारतात रस्ते अपघातात दुचाकीस्वारांचे सर्वाधिक मृत्यू होतात. यामुळे आयएसआय मार्क असलेली हेल्मेट दुचाकीस्वाराच्या डोक्यास सुरक्षा प्रदान करतात. मात्र, किंमत जास्त असल्याने आणि माहिती नसल्याने दुचाकीस्वार हलक्या दर्जाची हेल्मेट वापरतात. यामुळे अपघाती मृत्यू वाढत असल्याचे दुचाकी हेल्मेट उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजीव कपूर यांनी सांगितले. 
 सरकारी आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी दीड लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. यामध्ये सर्वाधिक दुचाकीस्वार असतात. बनावट हेल्मेट विक्रीवर बंदी आणल्यास लाखो जीव वाचू शकतात. तसेच नागरिकांमध्ये दर्जेदार उत्पादने वापरण्याची वृत्ती वाढीला लागणार असल्याचे कपूर यांनी सांगितले.

Web Title: using non ISI mark helmets...be careful...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.