भारतातील पहिल्या सोलर इलेक्ट्रिक कार Eva चे प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 10:20 IST2025-01-21T10:20:00+5:302025-01-21T10:20:32+5:30

या कारची किंमत ३.२५ लाख रुपयांपासून ते ५.९९ लाख रुपयांपर्यंत आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्ही बॅटरीचा पर्याय निवडू शकता. 

Vayve Eva Solar Electric Car Launch Price Rs 3.25 Lakh - Pre-Bookings Open | भारतातील पहिल्या सोलर इलेक्ट्रिक कार Eva चे प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या फीचर्स...

भारतातील पहिल्या सोलर इलेक्ट्रिक कार Eva चे प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या फीचर्स...

भारतातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कार ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये दाखल झाली आहे. ही कार सोलर एनर्जीवर चालणारी Solar Electric Car Eva आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत ३.२५ लाख रुपये आहे. कंपनीने ईवाचे तीन व्हेरिएंट्स लाँच केले आहेत. यामध्ये ९ किलोवॅट प्रति तास, १२ किलोवॅट प्रति तास आणि १८ किलोवॅट प्रति तास यांचा समावेश आहे. या कारची किंमत ३.२५ लाख रुपयांपासून ते ५.९९ लाख रुपयांपर्यंत आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्ही बॅटरीचा पर्याय निवडू शकता. 

कंपनीने या कारसाठी प्री-बुकिंग देखील सुरू केली आहे. तुम्ही ही कार थोडीशी रक्कम देऊन प्री-बुक करू शकता. जर तुम्हाला ही कार प्री-बुक करायची असेल तर तुम्हाला त्यासाठी फक्त ५,००० रुपये खर्च करावे लागतील. तुम्हाला या कारची डिलिव्हरी २०२६ मध्ये मिळू शकेल. ही कार बुक करणाऱ्या पहिल्या २५,००० ग्राहकांना अनेक बेनिफिट्स मिळतील. यामध्ये एक्सटेंडेट बॅटरी वॉरंटी, तीन वर्षांची मोफत वाहन कनेक्टिव्हिटी यासारख्या फीचर्सचा समावेश असेल.

ईवा ही टू-सीटर सिटी कार आहे. सध्याची रस्त्यांवरील वाहतूक कोडीं लक्षात घेता या कारचे डिझाइन करण्यात आले आहे. तसेच, एकदा फूल चार्ज केल्यानंतर ही कार २५० किलोमीटरची रिअल रेंज देते. या कारमध्ये लिक्विड बॅटरी कूलिंग, लॅपटॉप चार्जर, अॅपल कारप्ले टीएम, पॅनोरॅमिक ग्लास सनरूफ आणि अँड्रॉइड ऑटो टीएम देण्यात आले आहे. ही कॉम्पॅक्ट आकाराची सोलर कार पेट्रोल कारला ऑप्शन बनू शकते. या कारचा चालण्याचा खर्च प्रति किलोमीटर ०.५ रुपये आहे. हा पेट्रोल हॅचबॅकपेक्षा खूपच स्वस्त आहे.

ईवाचे सोलर पॅनेल
ईवाचे सोलर पॅनेल आणि इलेक्ट्रिक मोटर एकत्रितपणे उत्कृष्ट कामगिरी देऊ शकतात. कारचा कमाल वेग ताशी ७० किलोमीटर आहे. कार ५ सेकंदात ०-४० किलोमीटर प्रति तासाचा वेगवान वेग गाठू शकते. दरम्यान, ऑप्शनल सोलर रूफ ३००० किलोमीटरपर्यंत चार्जिंग देखील देऊ शकते.

Web Title: Vayve Eva Solar Electric Car Launch Price Rs 3.25 Lakh - Pre-Bookings Open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.