लक्झरी इलेक्ट्रिक स्कूटरची भारतात होणार एंट्री, Ola-Ather ला देणार टक्कर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 12:39 PM2022-02-24T12:39:14+5:302022-02-24T12:39:44+5:30

electric scooter : कंपनीने आता ईव्ही स्पेसमध्ये स्वारस्य दाखवले आहे आणि भारत सरकारद्वारे भविष्यात ईव्हीसाठी सबसिडी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आत्मनिर्भर होईल, अशी इकोसिस्टम भारतात आणू इच्छिते.

vespa electric scooter launch date india ola ather electric scooter subsidy on electric vehicle in india | लक्झरी इलेक्ट्रिक स्कूटरची भारतात होणार एंट्री, Ola-Ather ला देणार टक्कर!

लक्झरी इलेक्ट्रिक स्कूटरची भारतात होणार एंट्री, Ola-Ather ला देणार टक्कर!

googlenewsNext

नवी दिल्ली : इटालियन ऑटो कंपनी Piaggio चा स्कूटर ब्रँड Vespa लवकरच भारतातील इलेक्ट्रिक गाड्यांच्या सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. Vespa च्या रेट्रो-एस्थेटिक डिझाइनमुळे ही इटलीमधील लक्झरी स्कूटर ब्रँड म्हणून ओळखली जाते. कंपनीने आता ईव्ही स्पेसमध्ये स्वारस्य दाखवले आहे आणि भारत सरकारद्वारे भविष्यात ईव्हीसाठी सबसिडी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आत्मनिर्भर होईल, अशी इकोसिस्टम भारतात आणू इच्छिते.

Piaggio आणखी एक स्पोर्टी ब्रँड Aprilia देखील त्याच्या बॅनरखाली आणू शकते. आत्तापर्यंत, भारतात Vespa इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत (भारतात लॉन्च होण्याची तारीख) अद्याप उघड झालेली नाही. मीडियाशी बोलताना पियाजिओ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक Diego Graffi म्हणाले की, भारतात अशी ईव्ही इकोसिस्टम तयार करायची आहे, जी सबसिडीशिवायही टिकू शकेल. FAME II सबसिडीमुळे, भारतात इलेक्ट्रिक वाहनांची किंमत कमी राहते.

Diego Graffi म्हणाले, "आम्ही फक्त एंट्री घेण्यासाठी मार्केटमध्ये प्रवेश करू इच्छित नाही. आमच्याकडे पॉवरट्रेन असेल, जी आमच्या स्पेसिफिकेशनवर आधारित असेल. आम्हाला शेल्फमधून काहीही काढायचे नाही. त्यामुळे जास्त वेळ लागत आहे."  दरम्यान, Piaggio भारतात तीन चाकी वाहने बनवते. पण याचे  Vespa आणि Aprilia ब्रँड्सही इटलीमध्ये दुचाकी वाहने बनवतात. Vespa ब्रँड अंतर्गत भारतात इलेक्ट्रिक स्कूटर सादर करू इच्छित असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

यापूर्वी, कंपनीने ऑटो एक्सपो 2020 मध्ये Vespa Elettrica इलेक्ट्रिक स्कूटरचे प्रदर्शन केले होते. हे एका चार्जवर 100 किमी पर्यंतची रेंज देते. बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी चार तास लागतील. मात्र, कंपनीने याआधी युरो-स्पेक इलेक्ट्रिका बद्दल काहीही उघड केले नव्हते. Vespa मधील या इलेक्ट्रिक स्कूटरचे पीक पॉवर आउटपुट 4 kW आहे. कंपनी या स्कूटरचे अपडेटेड व्हर्जन भारतातही लॉन्च करू शकते, अशी शक्यता आहे. 

इलेक्ट्रिकला 4 KW ची इलेक्ट्रिक मोटर दिली जाईल, जी 5.36 हॉर्स पॉवरचा पीक पॉवर आणि 20 न्यूटन मीटर पीक टॉर्क जनरेट करेल. या स्कूटरची डिझाइन इटलीतील कंपनीने केली असून ही स्कूटर टू-व्हीलर सेगमेंटमध्ये नवीन ट्रेंड प्रस्थापित करेल अशी अपेक्षा आहे. इलेक्ट्रिक स्कूटर असल्याने Vespa Electrica ची किंमत थोडी जास्त असेल. वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, भारतीय बाजारात याची किंमत जवळपास 90 हजार रुपये असू शकते. कंपनी ही स्कूटर फक्त स्टँडर्ड मॉडेलमध्ये लॉन्च करण्याची शक्यता आहे. 

Web Title: vespa electric scooter launch date india ola ather electric scooter subsidy on electric vehicle in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.