Vida V1 Plus : हिरोची 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर 30 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 05:38 PM2024-03-01T17:38:16+5:302024-03-01T17:38:55+5:30

Hero MotoCorp launch Vida V1 Plus : हिरोच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत जानेवारी 2024 मध्ये गेल्या वर्षीच्या जानेवारी 2023  च्या तुलनेत 6.46 टक्क्यांनी घट झाली आहे.

Vida V1 Plus Electric Scooter Relaunched With Price Tag Rs 30,000 Less Than V1 Pro | Vida V1 Plus : हिरोची 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर 30 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत

Vida V1 Plus : हिरोची 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर 30 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत

Hero MotoCorp launch Vida V1 Plus : नवी दिल्ली : हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) आपली इलेक्ट्रिक स्कूटर अपडेट केल्यानंतर नवीन रुपात लाँच केली आहे. अपडेटसोबतच कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरची किंमतही कमी केली आहे. हिरोने अपडेटसोबतच Vida V1 Plus भारतात लाँच केली आहे. Vida V1 Plus ची किंमत हिरोच्या इतर मॉडेल्सच्या तुलनेत 30 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. तसेच, स्कूटरमधील फीचर्स आणि परफॉर्मेंस चांगला देण्यात आला आहे.

हिरो मोटोकॉर्पने लाँच केलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1.15 लाख रुपये आहे. यापूर्वी Vida V1 Pro चे मॉडेल लाँच करण्यात आले होते. त्या तुलनेत Vida V1 Plus चे दर 30 हजार रुपयांनी कमी झाले आहेत. Vida V1 Plus हे Vida V1 Pro चे अपडेटेड मॉडेल आहे.

हिरोच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत जानेवारी 2024 मध्ये गेल्या वर्षीच्या जानेवारी 2023  च्या तुलनेत 6.46 टक्क्यांनी घट झाली आहे. आता कंपनीने Vida V1 Pro अपडेट करून Vida V1 Plus लाँच केली आहे. तसेच, Vida V1 Pro च्या तुलनेत Vida V1 Plus ची किंमत 30 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. 

हिरो मोटोकॉर्पने जानेवारी 2024 मध्ये 1494 दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली. त्याचवेळी, गेल्या वर्षी जानेवारी 2023 मध्ये 6.46 टक्के अधिक इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या गेल्या होत्या. हिरो मोटोकॉर्पने सप्टेंबर 2023 मध्ये विक्रमी विक्री केली होती. हिरोने पहिल्यांदाच एका महिन्यात 3000 युनिट्सची विक्री केली होती. हिरो मोटोकॉर्पने आता Vida V1 Plus ची किंमत कमी केली असून लोकांच्या बजेटनुसार इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे.

स्कूटरमधील फीचर्स
Vida V1 Plus आणि Vida V1 Pro या दोन्ही स्कूटरमध्ये 6kW ची इलेक्ट्रिक मोटर आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. एलईडी लाइटिंग आणि मल्टीपल राइड मोड देखील आहेत. Vida V1 Plus मध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी ऑप्शन सुद्धा देण्यात आला आहे.
 

Web Title: Vida V1 Plus Electric Scooter Relaunched With Price Tag Rs 30,000 Less Than V1 Pro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.