Video: रॉल्स रॉयस ते लॅम्बोर्गिनी...या भारतीय अब्जाधीशाकडे आहेत 100 पेक्षा जास्त आलिशान कार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 04:28 PM2023-04-25T16:28:21+5:302023-04-25T16:29:04+5:30
Indian Billionaire Vikas Malu Cars: एका व्लॉगरने या व्यक्तीकडे कार कलेक्शन दाखवले आहे. तुम्हीही पाहा व्हिडिओ...
Vikas Malu Cars Collection: यूट्यूबवर जगभरातील अब्जाधीश आणि ख्यातनाम व्यक्तींचे कार कलेक्शन दाखवणारे अनेक व्हिडिओ आहेत. भारतातही अनेक तरुण उद्योजक आहेत, ज्यांच्याकडे आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे. तुम्ही अंबानी कुटुंबापासून ते अनेक बड्या उद्योगपती आणि सेलिब्रिटींचे कार कलेक्शन पाहिले असेल. पण आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्याच्याकडे 100 हून अधिक आलिशान गाड्या आहेत.
एका व्लॉगरने भारतीय अब्जाधीश विकास मालू यांच्या गाड्यांचे कलेक्शन आपल्या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. या गाड्या तुम्ही याआधी फक्त फोटोमध्येच पाहिल्या असतील. विकास मालू यांच्याकडे 100 हून अधिक आलिशान कार आहेत. विकास मालू हे कुबेर ग्रेन्स अँड स्पाइसेस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत.
व्लॉगरने Lamborghini Urus SUV दाखवून व्हिडिओची सुरुवात केली. यानंतर व्हिडिओमध्ये दाखवलेली पुढील कार बेंटले कॉन्टिनेंटल जीटी आहे. व्लॉगर व्हिडिओमध्ये पुढे लॅम्बोर्गिनी हुराकन एसटीओ दाखवते. या कारची किंमत सुमारे 4.99 कोटी रुपये (एक्स-शोरूम) आहे. यानंतर, पुढची कार ऑल-ब्लॅक बेंटले फ्लाइंग स्पर आहे.
याशिवाय, मर्सिडीज-मेबॅच GL600 SUV, टोयोटा टुंड्रा पिकअप, फोर्ड मस्टॅंग, बेंटले कार आणि कस्टम-मेड रोल्स-रॉयस फॅंटम यासारख्या इतर अनेक कार देखील व्हिडिओमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. या सर्व गाड्या कुबेर ग्रुपच्या आहेत. त्यांचा दुबईतही व्यवसाय आहे.