Video: नवी कोरी एमजी हेक्टर भररस्त्यात पेटली; कंपनीने कारण सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 02:16 PM2020-01-23T14:16:09+5:302020-01-26T10:06:41+5:30

गेल्याच महिन्यात वांद्रे येथे हेक्टरला आग लागली होती.

Video: MG Hector caught fire in delhi after mumbai; Company on silent mode | Video: नवी कोरी एमजी हेक्टर भररस्त्यात पेटली; कंपनीने कारण सांगितले

Video: नवी कोरी एमजी हेक्टर भररस्त्यात पेटली; कंपनीने कारण सांगितले

Next
ठळक मुद्देआज एमजीने त्यांच्या इलेक्ट्रीक एसयुव्हीच्या किंमती जाहीर केल्या आहेत. महिनाभरात दोन कार पेटल्यानंतरही एमजीने प्रतिक्रिया दिलेली नव्हती.

कमी काळात भारतीयांच्या पसंतीला उतरलेली चीनच्या मालकीची एमजी कंपनी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मुंबईनंतर हरियाणामध्ये ही घटना घडली आहे. याचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. या आगीच्या घटनेवर कंपनीने कारण दिले आहे. 


याआधी मुंबईतील वांद्रे येथे डिसेंबरमध्ये एमजी हेक्टरने पेट घेतला होता. बॉनेटमधून धूर निघताना दिसत होता. मात्र, आग बाहेर आली नव्हती. ही डिझेलची एसयुव्ही होती. यानंतर दुसरी घटना काही दिवसांपूर्वीच घडली असून दिल्लीमध्ये या कारने पेट घेतला. ही पेट्रोल कार होती. व्हिडीओमध्ये स्फोटाचेही आवाज येत आहेत. महत्वाचे म्हणजे ही कार रस्त्यावर येऊन केवळ 19 दिवस झाले आहेत. 

MG ZS EV : किंमतीची घोषणा; पाच दिवसांत एक लाखाने वाढली

MG Hector SUV Review : हेक्टरवर तरुणाई एवढी का भाळली? 40 लाखांच्या एसयुव्हीची फिचर्स 15 लाखांत? वाचा


मुंबईत पेटलेली एमजी हेक्टर

 


 

दिल्लीत पेटलेली एमजी हेक्टर

 

भुपेंद्र सिंह यांनी ही डिसेंबरमध्ये कार कंपनीच्या नावे खरेदी केली होती. ही कार केवळ 9 हजार किमीच चालली होती. भुपेंद्र यांनी लिहून दिले आहे की, त्यांनी डीलरशिपमधून काही अकसेसरीज लावली होती. त्यामुळे कदाचित आग लागली असेल. गाडीमध्ये काही समस्या नव्हती आणि कंपनीचा प्रतिसादही चांगला होता. आगीच्या व्हिडीओ सोबत त्यांचे पत्रही ट्विटरवर शेअर होत आहे.

यानंतर दोन दिवसांनी कंपनीने दोन तपास पथके नेमून आगीचे कारण शोधले आहे. यामध्ये कारच्या बॉनेटखाली इंजिनच्या आणि एबीएस मॉड्यूलच्या मध्ये उच्च तापमान असते. यामध्ये क्लिनिंग क्लॉथ किंवा तत्सम वस्तू अडकल्याने आग लागली होती. वाहनातील इलेक्ट्रीक भाग आणि फ्युअल लाईनमध्ये काहीही समस्या आढळली नाही. हेक्टर ही कार भारतीय रस्त्यांवर तब्बल 1 लाख किमी चालवून चाचणी घेतलेली आहे. आगीची घटना घडलेल्या कार मालकाकडे आणखी एक हेक्टर असून ती सुस्थितीत चालवत आहेत, असे कंपनीने म्हटले आहे.

Web Title: Video: MG Hector caught fire in delhi after mumbai; Company on silent mode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.