Video: कागदपत्रे, हेल्मेट होते, तरीही पोलिसाने 100 रुपयांची लाच घेतली; कॅमेरात कैद झाला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 09:03 AM2019-10-05T09:03:23+5:302019-10-05T09:04:13+5:30
ही घटना तामिळनाडूची आहे. या बाबतचा व्हिडीओ समोर आला आहे.
नवी दिल्ली : नवीन वाहतूक नियमांमुळे सध्या वाहनचालक कमालीचे सावध झाले आहेत. सुरुवातीला देशभरातून चलनाचे लाखांत गेलेले आकडे पाहून धास्तीही निर्माण झाली आहे. दुसरीकडे वाहतूक पोलिस याचा फायदा उठवतील, लाचेचे प्रकार वाढतील असा आरोप खुद्द मंत्र्यांनीच केलेला आहे. नुकतीच एक अशी घटना उघडकीस आली आहे, ज्यामध्ये पोलिस कर्मचारी दुचाकीस्वारांचे कागदपत्र योग्य असल्याने काहीच दंड करता आला नाही म्हणून 100 रुपयांची लाच मागत होता.
ही घटना तामिळनाडूची आहे. या बाबतचा व्हिडीओ समोर आला आहे. बाईकस्वाराच्या हल्मेटवरील कॅमेरावरून ही लाचखोरी टिपली गेली आहे. पोलिसाने दुचाकीवरून जाणाऱ्या पाच दुचाकीस्वारांना थांबविले आणि त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली. त्यांनी कागदपत्रे देताच त्यातून काही सापडत नसल्याचे पाहून हॅल्मेटही तपासली. मात्र, या सर्वांकडे हल्मेट होती. यामुळे त्यातही काही सापडले नाही. शेवटी त्याने त्यांची चौकशी सुरू केली आणि पाच जणांचे 100 रुपये मागितले. यासाठी त्यांने मान डोकावून दुचाकीही मोजल्या.
आणि हे पैसे मागताना त्याने तुम्हा पाच जणांसाठी 100 रुपये म्हणजे मोठी गोष्ट नाही, असेही म्हटले. हा व्हिडीओ तामिळनाडूचा असल्याने तमिळ भाषेत सर्वजण बोलत आहेत. पोलिसाने पैसे मागितल्यावर हे सर्वजण हसताना दिसतात. यानंतर या दुचाकीस्वाराने पोलिसाला पाकिटातून 100 रुपये काढून दिले. हे पैसे तो पोलिस खिशात घालतानाही दिसत आहे.