Video: महिलेने अशा जागी लपवली कारची चावी की दुनिया हैराण झाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 14:12 IST2019-08-16T14:11:03+5:302019-08-16T14:12:11+5:30
टेकक्रंचनुसार या महिला इजिनिअरचे नाव एमी डीडी (Amie DD) जी एक गेम डेव्हलपर आणि प्रोग्रॅमर आहे.

Video: महिलेने अशा जागी लपवली कारची चावी की दुनिया हैराण झाली...
हॅकिंगबाबत तुम्ही ऐकलेच असेल, पण कधी बायो हॅकिंगबाबत ऐकले आहे का? नुकत्याच एका महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरने बायो हॅकिंग करत सर्व जगाला आश्चर्यचकीत केले आहे. महिलेने तिच्या शरिराच्या एका अवयवामध्ये चीप लावली होते. याद्वारे या महिलेने टेस्ला कारच्या चावीसारखा वापर केला होता.
टेकक्रंचनुसार या महिला इजिनिअरचे नाव एमी डीडी (Amie DD) जी एक गेम डेव्हलपर आणि प्रोग्रॅमर आहे. या डीडीने बायो हॅकिंगचा एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. या महिलेने दावा केला आहे की, टेस्लाची मॉडेल 3 कारच्या वॉलेट कार्डमधून RFID चिप काढून तिच्या हातामध्ये त्वचेआड ठेवली आहे. यासाठी या महिलेने प्रोफेशनल बॉडी मॉडिफिकेशनची मदत घेतली आहे.
एमी डीडीने बायो हॅकिंग पहिल्यांदाच केले नाहीय. एमीने तिच्या दुसऱ्या हातात घरचा दरवाजा खोलण्यासाठी एक्सेस क्ट्रोल चिप लावली आहे. याची माहिती एमीने तिच्या ब्लॉगमध्ये दिली आहे. या चिपद्वारे एमी घराचा दरवाजाही उघडत आहे.
एमीने सांगितले की, कारची चावी हातामध्ये लपविण्याचा हेतू हा कार हाताने सुरू करणे हा होता. एमी टेस्लाच्या बग काऊंटी प्रोग्रॅममध्ये सहभागी आहे. या हॅकिंगमुळे टेस्ला एमीला मोठी रक्कमही बक्षीस म्हणून देणार आहे. मात्र, या रकमेचा खुलासा करण्यात आलेला नाही. आता एमी हाताने कार सुरू करते. तिला त्यासाठी चावी शोधण्याची गरज लागत नाही.