मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 08:21 PM2024-11-29T20:21:32+5:302024-11-29T20:23:08+5:30

Volkswagen India Tax Evasion news: महाराष्ट्राच्या सीमाशुल्क आयुक्त कार्यालयाने जारी केलेली ही नोटीस ९५ पानांची आहे. ही नोटीस सार्वजनिक नसली तरी याची माहिती फ्रँकफर्ट शेअर बाजाराला लागताच फोक्सवॅगनचे शेअर २.१३ टक्क्यांनी घसरले आहेत. याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांत आली आहे. 

volkswagen india, Skoda, Audi stole $1.4 billion in taxes; Already in crisis, it sent India a tax evasion notice | मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट

मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट

आर्थिक कारणांवरून आधीच संकटात असलेली जर्मन वाहन निर्माता कंपनी फोक्सवॅगनच्या अडचणीत वाढ झाली आहे. भारत सरकारने कंपनीला १.४ अब्ज डॉलर्सचा कर चोरी केल्याचा आरोप केला आहे. 

ऑडी, व्ही.डब्ल्यू. आणि स्कोडाने कारच्या सुट्या भागांवर मुद्दामहून कमी आयात कर भरून $1.4 अब्ज किमतीची करचोरी केल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे. फोक्सवॅगनने जवळजवळ पूर्ण कार अनसेम्बल स्थितीत आयात केली. भारतातील CKD किंवा पूर्णपणे तयार युनिट्सच्या नियमांनुसार 30-35 टक्के आयात कर आकारला जातो. परंतू या आयात सुट्या भागांना वैयक्तीक भाग म्हणून घोषित करून व चुकीचे वर्गीकरण करून कंपनीने मोठ्या प्रमाणावर कर चोरी केल्याचे यात म्हटले आहे. 

फोक्सवॅगन यासाठी चुकीची माहिती देऊन ३०-३५ टक्क्यांऐवजी केवळ ५ ते १५ टक्के करच भरत होती. ही आयात स्कोडा सुपर्ब आणि कोडियाक, ऑडी A4 आणि Q5 सारख्या लक्झरी कार आणि VW च्या टिगुआन सारख्या मॉडेल्ससाठी करण्यात आली होती. यासाठी वेगवेगळ्या शिपमेंट कन्साईनमेंटसचा वापर करण्यात आला. जेणेकरून या सुट्या भागांचा शोध लागण्यापासून ते जास्त कर भरण्याचे जाणूनबुजून टाळण्यात आल्याचे भारतीय तपास यंत्रणांना आढळले आहे. 

महाराष्ट्राच्या सीमाशुल्क आयुक्त कार्यालयाने जारी केलेली ही नोटीस ९५ पानांची आहे. ही नोटीस सार्वजनिक नसली तरी याची माहिती फ्रँकफर्ट शेअर बाजाराला लागताच फोक्सवॅगनचे शेअर २.१३ टक्क्यांनी घसरले आहेत. याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांत आली आहे. फोक्सवॅगन ही कंपनी आधीच आर्थिक संकटात सापडलेली आहे. जर्मनीतील अनेक उत्पादन प्रकल्प कंपनीने बंद केले आहेत. तसेच भारतातही अब्जावधी गुंतवून तोट्यात असल्याने ती भारतीय पार्टनरच्या शोधात आहे. अशातच आता ही करचोरी उघड झाल्याने कंपनीच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे.

Web Title: volkswagen india, Skoda, Audi stole $1.4 billion in taxes; Already in crisis, it sent India a tax evasion notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.