फोक्सवॅगनचा प्लॅटफॉर्म, फोर्डची पहिली ईव्ही कार १० जुलैला लाँच होणार, भारतात येणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 04:25 PM2024-06-27T16:25:14+5:302024-06-27T16:25:25+5:30

भारतातून काढता पाय घेताना फोर्डने एंडोव्हरसारखी मोठी कार आणि ईव्ही कारवर लक्ष देणार असल्याचे सांगून गेली होती. परंतू नंतर फोर्डने ईव्हीचा प्रकल्प गुंडाळल्याचेही वृत्त होते.

Volkswagen platform, Ford's first EV Ford Capri Electric SUV car to be launched on July 10, coming to India? | फोक्सवॅगनचा प्लॅटफॉर्म, फोर्डची पहिली ईव्ही कार १० जुलैला लाँच होणार, भारतात येणार?

फोक्सवॅगनचा प्लॅटफॉर्म, फोर्डची पहिली ईव्ही कार १० जुलैला लाँच होणार, भारतात येणार?

भारतातून जरी गेलेली असली तरी फोर्ड पुन्हा येणार असल्याचा बातम्या अधून मधून येत असतात. कधी या कारचा पेटंट रजिस्टर केला कधी त्या, अशी माहिती पसरत असते. ज्या लोकांनी फोर्डच्या गाड्या घेतल्या आहेत ते कंपनी परत यायची वाट पाहत आहेत. फोर्डनेही दोनपैकी एक प्लांट विकला आहे, परंतू एक प्लांट विकण्याची डील अचानक रद्द केल्याने ती परत येतेय अशी आशा दाखवून गेली आहे. आता फोर्ड पहिली इलेक्ट्रीक कार लाँच करणार आहे. 

भारतातून काढता पाय घेताना फोर्डने एंडोव्हरसारखी मोठी कार आणि ईव्ही कारवर लक्ष देणार असल्याचे सांगून गेली होती. परंतू नंतर फोर्डने ईव्हीचा प्रकल्प गुंडाळल्याचेही वृत्त होते. आता यावर फोर्डने ८० च्या दशकातील प्रसिद्ध कारच ईव्हीमध्ये आणण्याचे ठरविले आहे. Ford Motors जागतिक बाजारासाठी  Electric SUV लाँच करण्याची तयारी करत आहे. 

बाजाराला हादरवणारी गोष्ट म्हणजे १९७०-८० च्या दशकात फोर्डचे लोकप्रिय मॉडेल कॅप्रीला फोर्ड पुनर्जिवीत करत आहे. जवळपास ५० वर्षांनी फोर्ड या कारला पुनर्जन्म देणार आहे. कंपनीने या कारचा टीझर लाँच केला असून येत्या १० जुलैला ती जागतिक बाजारासाठी लाँच केली जाणार आहे. 

Ford Capri Electric SUV ची टीझर इमेज आली आहे. यामध्ये DRL हेडलाइट यूनिट आणि एलईडी टेललाइट्स दाखविण्यात आली आहे. याचबरोब या कॅप्रीचे स्पाय शॉटदेखील व्हायरल झाले आहेत. कॅप्री ही पूर्वी दोन डोअरची स्पोर्ट कार होती तिला कुपे कारमध्ये बदलण्यात आले आहे. 

Ford Motor ने फोक्सवॅगनच्या MEB प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे. हा प्लॅटफॉर्म हे 52kWh आणि 77kWh आकाराच्या दोन बॅटरी पॅकसाठी बनविण्यात आला आहे. याद्वारे फोर्ड युरोपमध्ये फोक्सवॅगनला तर अमेरिकेत टेस्लाला टक्कर देणार आहे. कंपनीने ही कार ग्लोबल डेब्यूसाठी आणलेली असली तरी भारतात ही कार येणार की नाही यावर काहीच खुलासा झालेला नाही. भविष्यात फोर्डचा भारतात पुन्हा प्रवेश करण्याचा मानस असला तरच ही कार भारतात येण्याची शक्यता आहे. 

Web Title: Volkswagen platform, Ford's first EV Ford Capri Electric SUV car to be launched on July 10, coming to India?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.