या कंपनीवर आली तब्बल 7 लाख कार माघारी बोलवण्याची वेळ...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 04:47 PM2018-08-21T16:47:24+5:302018-08-21T16:49:03+5:30
दोन वर्षांपूर्वी कारच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करून वायु उत्सर्जन चाचणीला दिलेला चकवा
मुंबई : कारच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करून पर्यावरणाशी खेळणाऱ्या फोक्सवॅगन कंपनीवर एक दोन हजार नव्हे तब्बल 7 लाख एसयुव्ही कार माघारी बोलविण्याची वेळ आली आहे. या एसयुव्हीच्या सनरुफमुळे कारला आग लागण्याच्या घटना समोर आल्या आहेत.
दोन वर्षांपूर्वी फोक्सवॅगन कंपनीने आपल्या कारच्या वायु उत्सर्जन तपासणीवेळी नियमानुसार वायू बाहेर पडतात हे दाखविण्यासाठी कारच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल केले होते. ही बाब एका भारतीय वंशाच्या तंत्रज्ञाने उघड केली होती. यानंतर जगभरात खळबळ माजली होती. या प्रकरणात कंपनीला जबर भुर्दंड बसला होता. त्याशिवाय कंपनीची विक्रीही मंदावली होती.
आता या जर्मन बनावटीच्या कंपनीच्या टिग्वान आणि टुरॉन या एसयुव्हीमध्ये वापरलेल्या सनरुफमध्ये दोष आढळला आहे. या सनरुफची इलेक्ट्रॉनिक यंत्रणा पाण्याच्या संपर्कात येत असल्याने कारला आग लागण्याची शक्यता आहे. हा दोष दूर करण्यासाठी कंपनीने तातडीने दुरुस्ती सुरु केली आहे. पाणी आतमध्ये येत असल्याने तो दोष शोधण्याचे काम सुरु आहे. यानंतर ही कंपनी आपल्या ग्राहकांना कार दुरुस्त करुन देणार आहे.
या काळादरम्यान ग्राहक आपल्या कारमध्ये शॉर्टसर्किट होईपर्यंत कार चालवू शकतात. या कारची संख्या 7 लाख आहे. जुलैमध्ये कंपनीने सांगितले होते की, ही सिस्टिम लालवेली फोक्सवॅगन, ऑडी आणि पोर्शच्या इलेक्ट्रीक आणि हायब्रिड कार कंपनी माघारी बोलवू शकते.