Volkswagen Taigun ची नवीन एडिशन लाँच, फक्त २५ हजारांत होईल बुकिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 07:05 PM2023-11-02T19:05:03+5:302023-11-02T19:10:11+5:30
नवीन Taigun मध्ये ट्रेल थीम ग्राफिक्स आणि रूफ रेल, क्रोम ग्रिल आणि फंक्शनल रूफ रेल आहेत.
नवी दिल्ली : फोक्सवॅगनने एक नवीन मध्यम आकाराची (मिजसाइज) एसयूव्ही लाँच केली आहे, जी टायगन (Taigun) ची GT Edge Trail आवृत्ती आहे. या कारचे बुकिंग सुरू झाले आहे. ग्राहकांना २५ हजार रुपये टोकन रक्कम भरून कारचे बुकिंग करता येईल. नवीन Taigun मध्ये ट्रेल थीम ग्राफिक्स आणि रूफ रेल, क्रोम ग्रिल आणि फंक्शनल रूफ रेल आहेत.
तसेच, कारमध्ये ब्लॅक डोअर आणि रेड टचसह ORVM देखील दिलेले आहेत. यासोबतच ही एसयूव्ही १६ इंच डिझायनर व्हील आणि मागच्या बाजूला ट्रेल बॅजसह येते. कारच्या इंटीरियरमध्ये काही कॉस्मेटिक अपडेट्स करण्यात आले आहेत. आतील बाजूस कारला 3D फ्लोअर मॅट्स, लेदर सीट कव्हर्स, ट्रेल बॅजिंग आणि कमी स्टीलचे पेडल्स देण्यात आले आहेत.
काय आहेत फीचर्स?
फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या कारमध्ये १०.१ इंच टच इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस ऍपल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो, वायरलेस चार्जर, अॅम्बियंट लाइटिंग, इलेक्ट्रिक सनरूफ, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, मल्टीफंक्शनल स्टीयरिंग व्हील्स, TPMS आणि अॅक्टिव्ह सिलिंडर मॅनेजमेंट सिस्टम यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
इंजिन आणि किंमत
Taigun GT Edge Trail Edition मध्ये १.5 लिटर, टर्बो-पेट्रोल इंजिन आहे. स्टँडर्ड मॉडेलमध्येही हेच इंजिन उपलब्ध आहे. त्याचे आउटपुट १४८bhp पॉवर आणि २५०Nm टॉर्क आहे. या इंजिनसह तुम्ही ६-स्पीड मॅन्युअल किंवा ७-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय निवडू शकता. या कारमध्ये अनेक ट्रॅक्शन मोड देखील देण्यात आले आहेत. याचबरोबर, या कारची किंमत १६.२९ लाख रुपये आहे, जी एक्स-शोरूमनुसार आहे.