व्होल्वोचा प्लॅटफॉर्म, मलेशिअन ब्रँड भारताचा अभ्यास करतोय; नेक्सॉन, क्रेटा, सेल्टॉसची सुट्टी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 01:15 PM2023-07-29T13:15:08+5:302023-07-29T13:15:30+5:30
प्रॉटॉनने एक्स ५० या कॉम्पॅक्ट एसयुव्हीची टेस्टिंग सुरु केली आहे. Proton X50 ही टेस्ट कार नुकतीच पुणे नाशिक हायवेवर दिसली आहे.
भारतीय रस्त्यांवर आता आणखी एक एसयुव्ही धावताना दिसणार आहे. परंतू, ही एसयुव्ही एकदम नव्या कंपनीची असणार आहे. मलेशियन ब्रँड प्रोटॉन भारतात एन्ट्री करण्याची तयारी करत आहे. या कारची टेस्टिंग भारतीय रस्त्यांवर सुरु असतानाचे फोटो आले आहेत.
प्रॉटॉनने एक्स ५० या कॉम्पॅक्ट एसयुव्हीची टेस्टिंग सुरु केली आहे. Proton X50 ही टेस्ट कार नुकतीच पुणे नाशिक हायवेवर दिसली आहे. लोकांना ही वेगळीत कार दिसल्याने त्यांनी कंपनी पाहिली, तरीही अनेकांना या कंपनीची कल्पना नसल्याने ते अनभिज्ञ होते.
या कारला स्टिकरनी झाकलेले नव्हते. म्हणजे याचा अर्थ प्रॉटॉन ही भारतीय बाजाराचा आढावा घेत आहे व परवडेल का याचा अंदाज घेत आहे. व्यवहार्यतेचा अभ्यास करत आहे. Proton X50 चीनच्या Geely आणि Volvo ने विकसित केलेल्या BMA मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. कारची लांबी 4,330 मिमी, रुंदी 1,800 मिमी आणि उंची 1,609 मिमी आहे आणि तिचा व्हीलबेस 2,600 मिमी आहे.
X50 क्रॉसओवरमध्ये काळे छत व मागील स्पॉयलरसह ड्युअल-टोन देण्यात आला आहे. डिक्कीच्या दरवाज्यावर "प्रोटॉन" म्हणणारी क्रोम पट्टी आणि एलईडी टेललाइट्स आहेत. कारमध्ये क्वाड एक्झॉस्ट टिप्स आणि डिफ्यूझर एलिमेंटसह स्पोर्टी रियर बंपर आहे.
जागतिक बाजारपेठेत, X50 ही कार 1.5-लीटर, 3-सिलेंडर टर्बो-पेट्रोल इंजिनसह येते. 148 BHP / 226 Nm आणि 175 BHP / 255 Nm असे दोन इंजिन पावर प्रकार आहेत. 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात येते. प्रॉटॉन भारतात लाँच झाली तर तिची टक्कर Hyundai Creta, Kia Seltos, MG Astor, Skoda Kushaq, VW Taigun, Maruti Grand Vitara यांच्यासह निस्सान, रेनॉच्या कारना टक्कर देणारी ठरणार आहे.