थोडं थांबा! एक, दोन नाही...Royal Enfield च्या चार बुलेट येतायत...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 09:58 AM2021-02-02T09:58:17+5:302021-02-02T09:58:48+5:30
Royal Enfield bullet : बुलेटला जो मान आहे अन्य कोणत्याही दुचाकीला नाही. मोठमोठ्या कंपन्यांनी प्रयत्न करून पाहिले परंतू बुलेट ती बुलेट. एक लाखापासून ते दोन-अडीज लाखांपर्यंत या धाकड बाईक मिळतात.
Royal Enfield ने भारतात जबरदस्त पाय रोवले आहेत. बुलेटला जो मान आहे अन्य कोणत्याही दुचाकीला नाही. मोठमोठ्या कंपन्यांनी प्रयत्न करून पाहिले परंतू बुलेट ती बुलेट. एक लाखापासून ते दोन-अडीज लाखांपर्यंत या धाकड बाईक मिळतात. परंतू त्यांची तरुण तुर्क ते म्हातारे खोतारे यांच्यामध्ये असलेली क्रेझ एवढी भन्नाट आहे की कंपनीलाही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे कठीण जाते. आता या धाकड बाईकचा वेटिंगही वर्षवर्षभर करावा लागतो.
जर नवीन बुलेट घ्यायची असेल तर थोडा वेळ थांबावे लागणार आहे. रॉयल एन्फील्ड भारतीय बाजारात नवीन मॉडेल लवकरच लाँच करणार आहे.
रॉयल एन्फील्ड हंटर
रॉयल एन्फील्ड हंटर ही बाईक क्लासिक 350 सीसी इंजिनची असणार आहे. क्लासिक 350 ला मोठी पसंती मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच लीक झालेल्या डॉक्युमेंटमध्ये रॉयल एन्फील्ड हंटर हे नाव समोर आले होते. ही बाईक नवीन जे प्लॅटफॉर्मवर बनविण्यात आली आहे.
रॉयल एन्फील्ड क्लासिक 350
ही बाईक खूपच गाजलेली आहे. या बाईकचे नवीन मॉडेल दुसऱ्या तिमाहीमध्ये लाँच केले जाणार आहे. ही बाईकदेखील नवीन जे प्लॅटफॉर्मवर बनविण्यात आली आहे. यामध्ये नवीन टेक्नॉलॉजीद्वारे वळण घेताना बाईक आधीपेक्षा जास्त स्टेबल असणार आहे.
रॉयल एन्फील्ड इंटरसेप्टर
रॉयल एनफील्डची ही बाईक 650cc इंजिनची आहे. आता ही बाईक 350 सीसीच्या इंजिनमध्येही येणार आहे. या बाईकला इंटरसेप्टर 350 चे नाव दिले जाऊ शकते. ही बाईक सिंगल एग्सॉस्ट सिस्टमसोबत लाँच केली जाणार आहे.
रॉयल एन्फील्ड क्रूझर 650
ही कंपनीची 650cc च्या इंजिनची बाईक आहे. ही बाईक रॉयल एन्फील्डच्या Interceptor 650 आणि Continental GT 650 चा पोर्टफोलिओमध्ये दिसणार आहे.