BMW C 400 GT : प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी भारतात लाँच होणार BMW ची पहिली स्कूटर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 04:19 PM2021-10-10T16:19:35+5:302021-10-10T16:20:30+5:30
BMW C 400 GT India launch date out: C400GT मध्ये पॉवरफुल इंजिन या प्रीमियम स्कूटरमध्ये 350cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन मिळू शकते.
नवी दिल्ली : जर तुम्ही एका चांगल्या स्कूटरची वाट पाहत असाल तर 12 ऑक्टोबर रोजी ही प्रतीक्षा संपणार आहे. जर्मन वाहन निर्मिता कंपनी बीएमडब्ल्यू मोटरराड इंडियाने (BMW Motorrad India) सांगितले की, BMW C400GT Maxi Scooter भारतात विक्रीसाठी 12 ऑक्टोबरपासून उपलब्ध होईल. कंपनीने सोशल मीडियाद्वारे याची पुष्टी केली आहे. (bmw c400gt maxi scooter launch india 12 october)
दरम्यान, BMW मोटरराड इंडियाने म्हटले आहे की,12 ऑक्टोबर रोजी BMW C400GT Maxi Scooter भारतीय बाजारात लॉन्च करण्यात येईल. मात्र, या स्कूटरची बुकिंग आधीच सुरू आहे आणि तुम्ही या स्कूटरची प्री-बुकिंग 1 लाख रुपयांचे टोकन भरून करू शकता.
भारतीय बाजारात या स्कूटरची टक्कर सुझुकी बर्गमॅन स्ट्रीट 125 आणि एप्रिलिया एसएक्सआर 160 शी होणार आहे. दरम्यान, C400GT शी स्पर्धा करण्यासाठी, होंडा लवकरच भारतीय बाजारात फोर्झा 350 लाँच करू शकते. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
तज्ज्ञांच्या मते, आपल्या सेगमेंटमध्ये C400GT भारतीय बाजारपेठेत सर्वात प्रीमियम स्कूटर असेल. जोपर्यंत किंमतीबाबत सांगायचे झाल्यास आहे, कंपनीने याबाबत उघड केले नाही, परंतु अंदाज असा लावला जात आहे की, या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 5 लाख ते 7 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते.
पॉवरफुल इंजिन
C400GT मध्ये पॉवरफुल इंजिन या प्रीमियम स्कूटरमध्ये 350cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन मिळू शकते. जे सीव्हीटी ट्रान्समिशनसह येते. हे इंजिन 33.5bhp पॉवर आणि 35Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यामध्ये राईड-बाय-वायर-थ्रॉटल, ट्रॅक्शन कंट्रोल आणि राइडिंग मोड यासारखी अनेक फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.
मस्क्युलर बॉडी
याचबरोबर, C400GT ला मस्क्युलर बॉडी पॅनेलसह संपूर्ण मॅक्सी-स्कूटर बॉडी किट देण्यात आली आहे. यामध्ये उंच विंडस्क्रीन, पुल-बॅक हँडलबार, एक मोठे स्टेप्ड सीट, ड्युअल फूटरेस्ट, फुल-एलईडी लाइटिंग, कीलेस इग्निशन, हीटेड ग्रिप्स, हीटेड सीट, एबीएस, अँटी-थेफ्ट अलार्म सिस्टम आणि एक ब्लूटूथ-इनेबल्ड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांचा समावेश आहे.