कमी बजेटमध्ये हवी मोठी कार?; १० लाखाहून कमी किमतीत मिळतात 'या' ७ सीटर गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 02:48 PM2022-09-04T14:48:34+5:302022-09-04T14:50:39+5:30

लवकरात लवकर निवडा तुमची आवडती सात सीटर कार.

Want a big car on a low budget?; 'These' 7 seater cars are available for less than 10 lakhs | कमी बजेटमध्ये हवी मोठी कार?; १० लाखाहून कमी किमतीत मिळतात 'या' ७ सीटर गाड्या

कमी बजेटमध्ये हवी मोठी कार?; १० लाखाहून कमी किमतीत मिळतात 'या' ७ सीटर गाड्या

Next

Seven Seaters Cars Under 10 Lakh: जर तुमचे कुटुंब मोठे असेल, तुम्हाला एकत्र लांबच्या सहलीला जायचे असेल तर तुमचे संपूर्ण कुटुंब एकाच गाडीने एकत्र जावे अशी तुमची इच्छा असेल. जर तुम्हालाही ही इच्छा पूर्ण करायची असेल पण तुमचे बजेट कमी आहे, तर आम्ही तुम्हाला अशाच काही सात सीटर वाहनांबद्दल सांगणार आहोत ज्यांची किंमत १० लाख रुपयांपेक्षा कमी आहे. मग आता उशीर कशाचा, लवकरात लवकर निवडा तुमची आवडती सात सीटर कार.

मारुती सुझुकी एर्टिगा पेट्रोल आणि सीएनजी इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. कार पेट्रोलवर २०.५१ किमी/प्रतिलीटर आणि सीएनजीवर २६.११ किमी/किलो मायलेज देते. या कारचा मेंटेनन्स खर्च खूपच कमी आहे. तसेच याचे अनेक व्हेरिएंट बाजारात उपलब्ध आहेत. या ७ सीटर कारची एक्स-शोरूम किंमत ८.४१ लाख रुपये आहे.

Renault Triber 
रेनॉल्टच्या या कारमध्ये 1.0L पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. हे बाजारात एकूण दहा व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या कारला NCAP कडून ४ स्टार सुरक्षा रेटिंग देखील आहे. ही देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर कार मानली जाते. या कारची एक्स-शोरूम किंमत ५.९१ लाख रुपये आहे. जर तुम्हाला कमी बजेटमध्ये चांगली ७ सीटर कार खरेदी करायची असेल तर हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

Mahindra Bolero Neo
महिंद्रा बोलेरोचा ही स्पेशल व्हेरिएंट आहे. या ७ सीटर कारला १७.८ सेमी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, क्रूझ कंट्रोल, फ्रंट आणि रियर पॉवर विंडो, पॉवरफुल एसी, ऑटोमॅटिक डोअर लॉक, EBD, ABS, ISOFIX चाइल्ड सीट्स, प्रशस्त बूट स्पेस, फॅब्रिक सीट्ससह इटालियन इंटिरियर्स मिळतात. एअरबॅग्ज सारखी उत्तम वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. या वाहनाची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ९.२९ लाख रुपये आहे.

Kia Carens
Kia Carens ला 1.5L, CRDi VGT डिझेल, Smartstream 1.4-L T-GDi पेट्रोल आणि Smartstream 1.5-लीटर पेट्रोल सारख्या तीन इंजिनांचा पर्याय मिळतो. या वाहनाचे ५ व्हेरिएंट बाजारात उपलब्ध आहेत. यात 7-स्पीड DCT, 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे तीन पर्याय आहेत. या कारची किंमत ९.५९ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

Mahindra Bolero 
महिंद्राच्या अत्यंत लोकप्रिय ७ सीटर कारमध्ये 1.5L, 3-सिलेंडर, mHawk 75 डिझेल इंजिन आहे. एअरबॅग्ज, एबीएस, म्युझिक सिस्टीम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि डिजिटल क्लस्टर सारखी वैशिष्ट्ये या वाहनात उपलब्ध आहेत. या कारची एक्स-शोरूम किंमत ९.८५ लाख रुपये आहे.

Web Title: Want a big car on a low budget?; 'These' 7 seater cars are available for less than 10 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.