व्हिंटेज कारचे मालक व्हायचेय का? आज आहे सुवर्णसंधी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 03:38 PM2018-11-21T15:38:51+5:302018-11-21T15:39:30+5:30
लिलाव ऑनलाईन पाहता, बोली लावता येणार आहे....
जुन्या काळातील कार म्हणजेच व्हिंटेज कार आपल्याही ताफ्यात असावी आणि ऐटीत त्यात बसून शहराचा फेरफटका मारावा अशी इच्छा सर्वांचीच असते. या कार विकत घ्यायची सुवर्णसंधी आज चालून आली आहे. 1900 च्या शतकातील या 10 कारचा0 अस्तगुरुकडून कालपासून लिलाव सुरु आहे. या कारना पहिल्या दिवशी तीन प्रस्ताव मिळाले आहेत.
अस्तगुरु हे मुंबईतील पहिले क्लासिक आणि व्हिंटेज कारचा लिलाव करणारे दालन आहे. यंद्याच्या लिलावामध्ये 1947 च्या रोल्स रॉयसपासून 1960 मधील अॅम्बेसिडर कार लिलावासाठी उपलब्ध आहे. या सर्व कारची सार्वत्रिक किंमत 2.46 कोटी रुपये आहे. या कार एकदम चकाचक, नव्या असल्यासारख्या ठेवण्यात आलेल्या आहेत. अस्तगुरुमध्ये या कार 20 आणि 21 नोव्हेंबरला रात्री 8.30 पर्यंत लिलावासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत.
या लिलावामध्ये 1937 मोरिस, 1969 फोक्सवॅगन बीटल आणि रोल्स रॉयसच्या कारवर मंगळवारी बोली लावण्यात आली. बीटल आणि मोरिसची आरक्षित किंमत अनुक्रमे 8 लाख आणि 18 लाख रुपये आहे. तर रोल्स रॉयसच्या सिल्व्हर व्रेथला 80 लाख रुपयांची बोली लागलेली आहे.
तसेच उर्वरित कारमध्ये 1956 ची डॉज किंग्सवे, 1951 मर्सिडिज बेंझ 170 व्ही आणि 1951 मधली शेवरले स्टाललाइन डिलक्स या कार आहेत. या कारचा लिलाव ऑनलाईन असून अस्तगुरुच्या अॅप किंवा वेबसाईटवर बोली लावता येऊ शकते. या कार चार वेगवेगळ्या मालकांच्या आहेत. यातील मोरिस ही कार गेल्या 27 वर्षांपासून दिवंगत चित्रकार एमएफ हुसेन यांच्या मालकीची आहे.