चांगली सीएनजी कार घ्यायचीय? हे आहेत सध्याचे टॉप ट्रेंडिंग पर्याय, खिसा हलका होणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 09:57 AM2023-03-22T09:57:31+5:302023-03-22T09:59:26+5:30
आता एसयुव्ही देखील सीएनजीमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. टाटाच्या दोन कार येणार आहेत. ह्युंदाई देखील त्यांच्या कार सीएनजीमध्ये आणण्याची तयारी करत आहे.
पेट्रोलच्या दरात चांगलीच वाढ झालीय, बॅरल निम्म्यावर आले तरी काही केंद्र सरकार दर कमी करायचे नाव घेत नाहीय. असे असताना सीएनजीच्याच कार काय तो दिलासा देत आहेत. सीएनजीदेखील महागलाय परंतू, डिझेलसारखे मायलेज हवे असेल तर आता त्यावाचून पर्याय नाही. अशातच सर्वच कंपन्या आपल्याकडील कार सीएनजीवर आणत आहेत. यात मारुती एक नंबरला आहे.
सध्या बाजारात मारुतीने ब्रेझा कार सीएनजीत आणली आहे. यामुळे आता एसयुव्ही देखील सीएनजीमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. टाटाच्या दोन कार येणार आहेत. ह्युंदाई देखील त्यांच्या कार सीएनजीमध्ये आणण्याची तयारी करत आहे. सध्या तुमच्या हातात काय पर्याय आहेत.
सध्या तरी मारुतीकडेच सीएनजी कारचा ताफा जास्त आहे. अल्टो, सेलेरिओपासून ते आता ग्रँड व्हिटारापर्यंत सीएनजी कार आहेत. सेलेरिओची एक्स शोरुम किंमत 6.72 लाख रुपये आहे. सीएनजीवर ही कार 35.60 km/kg मायलेज देते. वॅगनआर 6.43 लाख रुपयांच मिळते. या कारचे मायलेज 34.05 km/kg आहे.
मारुतीची त्यावरची कार डिझायर आणि स्विफ्ट देखील सीएनजीमध्ये आहे. Maruti Dzire CNG ची किंमत 8.32 लाख रुपये आहे. मायलेज 31.12km/kg एवढे देते. स्विफ्ट सीएनजीची 7.80 लाख रुपये किंमत असून 30.9 km/kg मायलेज देते.
बलेनो सीएनजीची एक्स शोरुम किंमत 8.30 लाख रुपयांपासून सुरु होते. 30.61 km/kg मायलेज मिळते. ब्रेझा सीएनजी 9.14 लाख रुपयांपासून सुरु होते. मायलेज 25.51 km/kg आहे.
टाटा टियागो सीएनजीची किंमत 6.44 लाख रुपये असून मायलेज 27 किलोमीटर प्रति किलोग्राम एवढे आहे. तर टाटाची टिगॉर सीएनजी 7.60 लाख रुपयांपासून सुरु होते. याचे मायलेज 27 किलोमीटर प्रति किलोग्राम एवढे आहे.