Top 10 Cars Waiting Period: कार घ्यायचीये? क्रेटा, विटारा ते थार आणि स्कॉर्पिओपर्यंत; मोठा वेटिंग पीरिअड, बुक करण्यापूर्वी पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 09:44 PM2023-02-15T21:44:30+5:302023-02-15T21:45:07+5:30
Top 10 Cars Waiting Period: सध्या तुम्ही कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. सध्या बहुतांश कंपन्यांच्या कार खरेदीसाठी मोठं वेटिंग आहे.
जर तुम्ही आता SUV किंवा MPV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्याचा वेटिंग पीरिअडदेखील माहित असणे आवश्यक आहे. कारण वाहनांची वाढती मागणी असताना चिप-सेमीकंडक्टरची समस्या अजूनही कायम आहे. तसेच, वाहनांमधील 6 एअरबॅगसह अनेक ॲडव्हान्स्ड फीचर्समुळे उत्पादनात विलंब होत आहे. अशा स्थितीत अनेक वाहनांचा वेटिंग पीरिअड 18 महिन्यांपर्यंत म्हणजेच दीड वर्षांपर्यंत पोहोचला आहे.
म्हणजेच, जर तुम्ही फेब्रुवारी 2023 मध्ये वाहन बुक केले तर त्याची डिलिव्हरी ऑगस्ट 2024 मध्ये उपलब्ध होईल. तथापि, काही कारसाठी हा वेटिंग पीरिअड 7 महिन्यांची आहे. म्हणजेच, तुम्ही आजच बुक केल्यास तुम्हाला त्यांची डिलिव्हरी सप्टेंबर 2023 मध्ये मिळेल. म्हणजेच गणेश चतुर्थीच्या काळात कार उपलब्ध होईल, असेही गृहीत धरले जाऊ शकते.
टोयोटा हायक्रॉसचा वेटिंग पीरिअड सर्वात मोठा आहे. ही कार आज बुक केल तर त्याची डिलिव्हरी तुम्हाला 18 महिन्यांनंतर मिळेल. त्याचप्रमाणे महिंद्रा थारवर 17 महिने, टोयोटा हायराइडरवर 15 महिने, महिंद्रा स्कॉर्पिओवर 15 महिने, महिंद्रा XUV700 वर 11 महिने, किया केरेन्सवर 11 महिने, मारुती ब्रेझावर 9 महिने, किया सोनेटवर 9 महिन्यांपर्यंत वेटिंग पीरिअड आहे. Hyundai Creta वर 8 महिने आणि Maruti Grand Vitara वर 7 महिन्यांपर्यंत वेटिंग पीरिअड आहे. अशा परिस्थितीत, यापैकी कोणतेही मॉडेल खरेदी करण्यापूर्वी, डीलरकडून कारचा वेटिंग पीरिअड जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
हायक्रॉसची डिलिव्हरी सुरु
Toyota ने डिसेंबर 2022 मध्ये आपली नवीन Innova Highcross लाँच केली. मात्र, लॉन्च होण्यापूर्वी नोव्हेंबरमध्ये त्याचे बुकिंग सुरू झाले. हे एकूण 5 ट्रिम्स G, GX, VX, ZX आणि ZX (O) मध्ये लाँच करण्यात आले आहे. VX, ZX आणि ZX (O) ट्रिम हायब्रिड इंजिनसह येतात. त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 18.3 लाख रुपये आहे. तर, टॉप मॉडेलची किंमत 28.97 लाख रुपये आहे. कंपनीने गेल्या महिन्यात या कारची डिलिव्हरी सुरू केली. मात्र, 20 दिवसांपूर्वीपर्यंत या कारसाठी 1 वर्षाचा वेटिंग पीरिअड होता. आता तो वाढून दीड वर्ष झाला आहे. ही एमपीव्ही अनेक स्मार्ट ॲडव्हान्स्ड फीचर्सने सुसज्ज आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने या कारमध्ये 6 एअरबॅगसह ADAS तंत्रज्ञान देण्यात आले आहे.