केवळ ४० हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करायचीये Electric Scooter?; पाहा कोणते आहेत पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 04:48 PM2022-01-18T16:48:30+5:302022-01-18T16:48:46+5:30

Electric Scooter in Budget: रेंज, बॅटरी, मोटर आणि किंमत यावरून पाहा कोणती आहे तुमच्यासाठी बेस्ट इलेक्ट्रीक स्कूटर.

Want to buy an electric scooter with a less budget under 40,000 See what the options we have | केवळ ४० हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करायचीये Electric Scooter?; पाहा कोणते आहेत पर्याय

केवळ ४० हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करायचीये Electric Scooter?; पाहा कोणते आहेत पर्याय

googlenewsNext

Budget Electric Scooter: जर तुम्ही कमी बजेटमध्ये (Less Budget) नवीन इलेक्ट्रीक स्कूटर (Electric Scooter) घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती येथे देत आहोत. या इलेक्ट्रीक स्कूटर्सची रेंज काय आहे, त्यांना चार्ज करण्यासाठी किती वेळ लागतो, त्यांचा टॉप स्पीड काय आहे याची सर्व माहिती आपण पाहून घेऊ.

Evolet Pony: ही इलेक्ट्रीक स्कूटर 2 व्हेरिअंटमध्ये येते. त्याच्या EZ मॉडेलची किंमत 39541 रुपये आहे. त्याच्या रेंजबद्दल सांगायचं झालं तर, ते एका चार्जवर ही स्कूटर 80 किमी पर्यंत जाऊ शकते तर त्याचा टॉप स्पीड 25 किमी प्रति तास आहे. ही स्कूटर संपूर्ण चार्ज होण्यासाठी 7-8 तासांचा कालावधी लागतो. ही स्कूटर केवळ लाल रंगात उपलब्ध आहे. यात 250 वॅटची मोटर देण्यात आली आहे.

Ampere V48: कंपनीने ही स्कूटर फक्त एकाच व्हेरिअंटमध्ये बाजारात लाँच केली आहे. या स्कूटरमध्ये 48V आणि 20Ah बॅटरी देण्यात आलीये. यासोबतच 250 वॅटची BLDC मोटर देण्यात आली आहे. एका चार्जवर स्कूटर 50 किमी चालवता येऊ शकते असा दावा कंपनीनं केला आहे. या स्कूटरची किंमत 37790 रुपये असून टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास इतका आहे.

Ujaas eZy: या स्कूटरमध्ये कंपनीने 48V आणि 26Ah बॅटरी दिली असून त्यासोबत 250 वॅटची मोटर देण्यात आली आहे. सामान्य चार्जरने चार्ज बॅटरी चार्ज केल्यास ती स्कूटर पूर्ण चार्ज होण्यासाठी  6 ते 7 तासांचा कालावधी लागत असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 60 किमीची रेंज देते. या स्कूटरची सुरुवातीची किंमत 31,880 रुपये इतकी आहे.

Ujaas eGO LA: या स्कूटरमध्ये कंपनीने 60V, 26 Ah चा बॅटरी पॅक दिला आहे. यात 250W ची मोटर देखील आहे. सामान्य चार्जरने बॅटरी चार्ज केल्यास ती 6 ते 7 तासांत पूर्ण चार्ज होते असा दावा कंपनीनं केला आहे. रेंजबद्दल बोलायचे झाले तर ही स्कूटर पूर्ण चार्ज केल्यानंतर 75 किमी पर्यंतची रेंज देते. या स्कूटरची सुरुवातीची किंमत 34,880 रुपये आहे, तर या स्कूटरचं टॉप व्हेरिअंट 39,880 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.

Web Title: Want to buy an electric scooter with a less budget under 40,000 See what the options we have

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.