कारची महत्त्वाची कागदपत्रे कोणती, त्यात काय असायला हवे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 10:30 AM2017-09-18T10:30:33+5:302017-09-18T10:30:33+5:30
वाहनाची नोदणी कागदपत्रे, विमा कागदपत्रे आदी महत्त्वाची कागदपत्रे सतत तुमच्या कारमध्ये असावीत सर्व मूळ प्रती ठेवणे शक्य नसले तर झेरॉक्स प्रतीवर गॅझेटेड ऑफिसरच्या सही शिक्का असणारी प्रत मात्र जरूर ठेवा.
वाहन रस्त्यावर आणण्यापूर्वी ते प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून म्हणजे आरटीओकडून पूर्णपणे नोंदणीकृत व कायदेशीरदृष्टीने, नियमांच्यादृष्टीने पात्र असणे गरजेचे असते. त्यासाठी कोणतेही वाहन रस्त्यावर आणण्यापूर्वी मग ते नवे असो की जुने त्याची कागदपत्रे व आरटीओच्या नियमांमध्ये पात्र असलेले हवे.त्यासाठी आरटीओने त्या वाहनाची सारी संबंधित कागदपत्रे व प्रक्रिया पूर्ण केलेली हवी. हे सर्व करण्यासाठी प्रत्येक जण वैयक्तिक उपस्थिती लावून आपल्या कारचे काम काही पूर्ण करीत नाही. त्यामुळे कारची कागदपत्रे नेमकती कोणती असतात,ते पाहाणे व लक्षता ठेवून त्याची नोंद करणेही गरजेचे आहे. आयत्यावेळी कोणा सरकारी अधिकाऱ्याने, पोलीस व आरटीओ अधिकाऱ्याने मागमी केली तर ती कागदपत्रे गाडीमध्ये असणे गरजेचे आहे. सर्वसाधारण झेरॉक्स तरी ठेवा असे सांगितले जाते, मात्र केवळ झेरॉक्स ठेवणे कायद्याला धरून नाही, ते चालते इतक्याच निकषावर ग्राह्य आहे.
तुमचे वाहन चारचाकी असेल तर त्यामध्ये कागदपत्रे ठेव्यासाठी नीट जागा असते.तसेच सर्वसाधारणपणे तुमच्या दुचाकी वाहनासाठीही ती जागा असते. मात्र खास करून मोटारसायकलमध्ये तितकी जागा नसते. त्यामुळे अनेकजण झेरॉक्सही पूर्ण ठेवत नाहीत. व्यावसायिक वाहने सोडून वैयक्तिक वापराच्या वाहनांमध्ये त्या वाहनाचे आर. सी. बुक, विमा पॉलिसी, पी.यू.सी., तसेच कारच्या वॉरंटीसंबंधातील कागदत्रे, खरेदीची कागदपत्रे, देखभाल कराराचे बुकलेट आदी कागदपत्रे असतात.यामध्ये आर. सी. बुक, वाहनाच्य़ा विम्याची पॉलिसी, व पी.यू.सी. ही कागदपत्रे असायलाच हवीत. त्यामध्ये पीयूसी मूळ हवे. तर आर. सी. बुक, विमा पॉलिसी याची झेरॉक्सप्रत असेल तर ती गॅझेटेड ऑफिसरची सही-शिक्का असलेली ठेवावीत. केवळ झेरॉक्स ठेवू नयेत. जरी सध्या कोणी विचारीत नसले वा केवळ विश्वासावर पोलीस तपासणीतून सुटत असलात, तरी कायद्यानुसार तुमच्या कागदपत्रांच्या या मूळ प्रती तुम्ह जवळ ठेवणार नाही, परंतु, गॅझेटेड ऑफिसरच्या सही शिक्क्याच्या या प्रती वाहनात असणे किमान गरजेचे आहे. पीयूसी हे मूळ असणे गरजेचे आहे. तर देखभाल व अन्य बाबींसाठी गरजेचे असणारे कंपनीच्या सेवाकेंद्राचे बुकलेट हे तुमच्या उपयुक्ततेसाठी आवश्यक असेल.