पार्किंगमधून कार, बाईक चोरीला गेली तर काय? सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 01:27 PM2022-12-03T13:27:03+5:302022-12-03T13:27:19+5:30
गाडी पार्किंगमध्ये लावल्यानंतर चोरीला गेल्याच्या अनेक घटना ऐकीवात असतात. चोरट्यांसाठी पार्किंग हेच चोरीचे मुख्य ठिकाण असते. देशात आधीपासूच यासंबंधीचे कायदे आहेत जे तुम्हाला नुकसानीपासून वाचवितात.
आजकाल गाड्याच एवढ्या झाल्यात की पार्किंगचा मोठा मुद्दा समोर येत असतो. अशातच एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर गाडी खूप वेळ पार्क करावी लागते. अशावेळी तुमची कार चोरीला गेली तर, किंवा आतील वस्तू चोरीला गेल्या तर किती मोठी पंचाईत.
गाडी पार्किंगमध्ये लावल्यानंतर चोरीला गेल्याच्या अनेक घटना ऐकीवात असतात. चोरट्यांसाठी पार्किंग हेच चोरीचे मुख्य ठिकाण असते. अशावेळी तुम्ही काय कराल? देशात आधीपासूच यासंबंधीचे कायदे आहेत जे तुम्हाला नुकसानीपासून वाचवितात.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, एखादा ग्राहक हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये गेला आणि त्याच्या कारच्या चाव्या त्याच्या व्यवस्थापनाकडे दिल्यास, कारच्या सुरक्षेची जबाबदारी ही हॉटेलचीच राहिल. अशा परिस्थितीत कार चोरीला गेल्यास किंवा त्यात काही नुकसान झाल्यास हॉटेलकडून नुकसान भरपाई दिली जाईल. मात्र, चोरीच्या वेळी वाहनाची चावी व्यवस्थापनाकडेच असावी, ही त्यातीच अट आहे.
जर हॉटेलने पार्किंगची व्यवस्था केली असेल आणि त्याच पार्किंगमध्ये कारचे काही नुकसान किंवा चोरी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी हॉटेलची असेल. हॉटेलच्या फ्री पार्किंग एरियामध्ये तुमचे वाहन उभे केले असले तरीही नुकसान भरपाई ह़ॉटेलनेच देणे बंधनकारक आहे. कार पार्किंग मोफत दिल्याचे कारण देत हॉटेलने पैसे देण्यास नकार देता येणार नाही. कारण नियमानुसार हॉटेल्स ग्राहकांकडून खोली, भोजन, प्रवेश शुल्क अशा अनेक प्रकारे पैसे घेतात, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.