चांगले मायलेज मिळण्यासाठी बाईकचा वेग किती असावा? या गोष्टी लक्षात असुद्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 17:56 IST2024-12-01T17:55:46+5:302024-12-01T17:56:00+5:30

Bike mileage improve: जर तुमचे रोजचे चालविण्याचे अंतर कमी असेल तर तुमची बाईक एकदा टाकी फुल केली की जास्त दिवस चालते. परंतू जर १० ते २० किमीचे अंतर तुम्हाला रोज कापायचे असेल तर मात्र तुम्हाला दर आठवड्याला पेट्रोल पंपाला भेट देणे गरजेचे ठरते. अशा वेळी तुम्हाला इलेक्ट्रीक स्कूटर उपयोगाच्या ठरतात. 

What should be the bike speed to get good mileage? Keep these things in mind... | चांगले मायलेज मिळण्यासाठी बाईकचा वेग किती असावा? या गोष्टी लक्षात असुद्या...

चांगले मायलेज मिळण्यासाठी बाईकचा वेग किती असावा? या गोष्टी लक्षात असुद्या...

फुल टँक करून बाईक चालविण्याचा फायदा आपण पाहिला. आता चांगले मायलेज मिळण्यासाठी बाईकचा योग्य वेग कोणता असावा याविषयी पाहुयात. अनेकांना त्यांच्या स्कूटर, बाईक वेगवेगळे मायलेज देतात. कारण प्रत्येकाची चालविण्याची पद्धत वेगळी असते. परंतू, जर वेग कायम एकच ठेवला, जास्त इंजिन गुरगुरवले नाही तर तुम्हाला चांगले मायलेज मिळू शकते. 

जर तुमचे रोजचे चालविण्याचे अंतर कमी असेल तर तुमची बाईक एकदा टाकी फुल केली की जास्त दिवस चालते. परंतू जर १० ते २० किमीचे अंतर तुम्हाला रोज कापायचे असेल तर मात्र तुम्हाला दर आठवड्याला पेट्रोल पंपाला भेट देणे गरजेचे ठरते. अशा वेळी तुम्हाला इलेक्ट्रीक स्कूटर उपयोगाच्या ठरतात. 

चांगले मायलेज मिळण्यासाठी बाईकचा आयडिअल वेग किती असावा? कोणत्या वेगात बाईक चांगला परफॉर्मन्स देते याविषयी तज्ञांनी माहिती दिली आहे. बाईकचा आयडिअल वेग हा ४० ते ६० किमी प्रति तास असावा. या वेगात बाईक तुम्हाला चांगला परफॉर्मन्स आणि चांगले मायलेज काढून देते. अनेकदा आपण क्लच दाबून बाईकचा वेग वाढविण्याचा प्रयत्न करतो यात पेट्रोल जास्त जाळले जाते. 

अनेकदा जास्त वाहतूक असलेला, जास्त स्पीड ब्रेकर असलेला मार्ग निवडला जातो. यामुळे देखील मायलेजवर परिणाम होते. यामुळे कमी वाहतूक असेलेला रस्ता निवडवा. तसेच टायरचे प्रेशर योग्य ठेवावे. अनेकजण महिनोंमहिने टायरमधील हवेकडे पाहतच नाहीत. मग हवा कमी झाली की गाडी पिकअपसाठी जास्त ताकद घेते, जास्त इंधन जाळते व आपसूकच खिसाही जास्त कापला जातो. 

सर्व्हिसिंग योग्य वेळी आणि वारंवार करावी. जेणेकरून जे बॉलबेअरिंगसारखे पार्ट आहेत ते ऑईलिंग झाल्याने स्मूथ चालू लागतात. तसेच यामुळे इंजिनवरील वाहन पुढे ढकलण्याचा लोड कमी होतो व गाडी वेगाने धावू लागते. 

Web Title: What should be the bike speed to get good mileage? Keep these things in mind...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.