कार लोन घेण्याचा मानस आहे? 'या' गोष्टींचा नक्की विचार करा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 07:33 AM2022-02-04T07:33:46+5:302022-02-04T07:34:17+5:30
गाडी घेण्याची हौस प्रत्येकाला असतेच. त्यासाठी कर्जाचे पर्याय शोधले जातात
लोकमत न्यूज नेटवर्क : कोरोनाकाळात खासगी वाहन वापरण्यावर अधिक भर देण्यात आला. त्यामुळे कारच्या खरेदीत अलीकडे वाढ झाल्याचे आढळून आले. मात्र, निर्बंध सैल होताच हा ट्रेण्ड कमी होत चालल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी गाडी घेण्याची हौस प्रत्येकाला असतेच. त्यासाठी कर्जाचे पर्याय शोधले जातात. गाडीसाठी कर्ज घेताना गाही गोष्टींचा बारकाईने विचार होणे गरेजेचे आहे.
खर्चाचे गणित मांडा
गाडी घेताना तिची कितपत आवश्यकता आहे, याचा प्रथम विचार करा.
आपला मासिक खर्च, गृहकर्जाचे हप्ते, मुलांच्या फिया इत्यादींचा प्रधान्याने विचार करणे गरजेचे आहे.
कारसाठी कर्ज घेताना किती ईएमआय असावा, याचाही विचार करून ठेवा.
सर्व खर्चाचा हिशोब कागदावर मांडून बघा आणि मग निर्णय घ्या.
झिरो डाऊन पेमेंट पर्याय टाळा
कार घेताना अनेकदा झिरो डाऊन पेमेंट योजना दाखवली जाते.
झिरो डाऊन पेमेंट याचाच दुसरा अर्थ कारसाठी अधिक रकमेचे कर्ज घेणे होय.
तुम्ही गाडी घेताना अधिकाधिक डाऊन पेमेंट करणे अधिक योग्य ठरेल.
कारण त्यामुळे कर्जाची रक्कम कमी होऊन ईएमआय कमी होतो.
रिपेमेंट दीर्घकाळपर्यंत नको
कारसाठी कर्ज घेतल्यानंतर त्याची परतफेड करण्यासाठी दीर्घ कालावधीचा पर्याय निवडू नका.
दीर्घ कालावधीपर्यंत कर्ज फेडण्याचा निर्णय घेतल्यास गाडीच्या किमतीपेक्षा अधिक कर्ज तुम्ही फेडता.
त्यामुळे शक्यतो कर्ज परतफेडीचा कालावधी कमीत कमीच असावा.
त्यासाठी कार लोन कॅलक्युलेटचा वापर करून कर्जाचा हप्ता किती आणि कर्ज किती वर्षांत फेडता येईल, याचा अंदाज
बांधता येतो.