व्हॉट अ ट्रिक... फक्त २,९९९ रुपयांत घरी घेऊन या इलेक्ट्रिक बाईक!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 06:00 PM2019-08-28T18:00:37+5:302019-08-28T18:00:55+5:30
रिवॉल्ट (Revolt) कंपनीने भारतीय बाजारपेठेत आज (28 ऑगस्ट) दोन इलेक्ट्रीक बाईक्स लॅान्च केल्या आहेत.
नवी दिल्ली: रिवॉल्ट (Revolt) कंपनीने भारतीय बाजारपेठेत आज (28 ऑगस्ट) दोन इलेक्ट्रीक बाईक्स लॅान्च केल्या आहेत. यामध्ये रिवॉल्ट आरव्ही 400 आणि रिवॉल्ट आरव्ही 300 यांचा समावेश आहे. तसेच कंपनीने ग्राहकांना आर्कषीत करण्यासाठी कंपनीने या दोन्ही बाईक्स एका अनोख्या पेमेंट प्लॅनसह लॅान्च केल्या आहेत.
यामध्ये तुम्हाला जर आरव्ही 400चे मॅाडेल खरेदी करायचे असल्यास दर महिन्याला 3499 रुपये आणि टॅाप मॅाडेलसाठी दरमहा 3999 रुपये भरुन तुम्ही ही बाईक खरेदी करता येणार आहे. तसेच आरव्ही 300चे मॅाडलसाठी दरमहा 2999 रुपये भरुन आता खरेदी करता येणार असून हे पैसे तुम्हाला 37 महिने भरावे लागेल. त्याचप्रमाणे यासाठी ग्राहकांना डाउन पेमेंट व भाडेपट्टीची योजना नसून ग्राहक पहिल्या दिवसापासूनच बाईकचा पूर्णपणे मालक असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
रिवॉल्ट आरव्ही 300
आरव्ही 300 इलेक्ट्रीक बाईकमध्ये 1.5KW ची मोटर आणि 2.7KW ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच या बाईकची टॅाप स्पीड 65 किलोमीटर प्रति तास इतकी असणार आहे. फुल चार्ज झाल्यानंतर ही बाइक 80 ते 150 किलोमीटर पर्यत चालू शकणार आहे.
रिवॉल्ट आरव्ही 400
आरव्ही 400 इलेक्ट्रीक बाईकमध्ये 3KW ची मोटर आणि 3.24 KW लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. तसेच ही बाइक फुल चार्ज झाल्यानंतर 156 किलोमीटर पर्यत चालू शकणार आहे. त्याचप्रमाणे या बाईकचा टॅाप स्पीड 85 किलोमीटर प्रति तास असणार आहे.
रिवोल्ट आरव्ही 400 मॅाडलची विक्रीची सुरुवात सप्टेंबरपासून दिल्ली व पुण्यात होणार आहे. तसेच पुढील चार महिन्यानंतर या इलेक्ट्रीक बाईक बंगळुरू, हैद्राबाद, नागपूर, अहमदाबाद आणि चेन्नई मध्ये लॅान्च करण्यात येणार आहे.