आता Ertiga चं काय होणार? बाजारात येतायत नव्या 7 सिटर कार, धडाधड लॉन्च होणार 3 नवे मॉडेल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 08:09 PM2023-03-15T20:09:31+5:302023-03-15T20:09:54+5:30
आता लवकरच मारुती एर्टिगाच्या अडचणी वाढणार आहेत. बाजारात याच प्राईस रेन्जमध्ये 3 नव्या MPV लॉन्च होत आहेत.
मारुती सुझुकी एर्टिगा ही भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर पसंत केली जाणारी कॉम्पॅक्ट MPV कार आहे. किफायतशीर किंमत, प्रशस्त इंटिरियर आणि मायलेज यामुळे ही कार अधिक पसंत केली जाते. या कारची किंमत 8.35 लाख रुपयांपासून सुरू होऊन 12.79 लाख रुपयांपर्यंत जाते. महत्वाचे म्हणजे ही कार अनेक वेळा देशातील सर्वाधिक विकली जाणारी 7 सीटर कारही ठरली आहे. मात्र आता लवकरच मारुती एर्टिगाच्या अडचणी वाढणार आहेत. बाजारात याच प्राईस रेन्जमध्ये 3 नव्या MPV लॉन्च होत आहेत.
Citroen 7 Seater MPV
फ्रान्सची वाहन निर्माता कंपनी Citroen एका नव्या MPV वर काम करत आहे. जी C3 हॅचबॅकवर आधारित असेल. कंपनी या कारचे 5-सिटर व्हर्जनही लॉन्च करत आहे. जे कॉम्पॅक्ट एसयूव्हीला टक्कर देईल. नवी सिट्रोएन 7-सीटर एमपीव्हीचे नाव C3 एअरक्रॉस असू शकते. हिचे बेस व्हेरिअंट Maruti Ertiga ला टक्कर देईल, तसेच हिचे टॉप ट्रिम्स Kia Carens चा सामना करेल. यात 1.2 लिटर, 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन मिळू शकते. तसेच, या खालच्या व्हेरिअँटमध्ये मॅन्युअल गिअरबॉक्ससह 1.0 लिटर नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल मोटर मिळू शकते.
Nissan 7 Seater MPV -
निसान इंडियाने नुकतेच आपल्या पोर्टफोलिओ वाढविण्यासंदर्भात घोषणा केली. ही कंपनी 2 नव्या एसयूव्हीसह 1 नवी एमपीव्हीही घेऊन येत आहे. कंपनीची 7-सीटर एमपीव्ही रेनॉल्टची 7-सीटर ट्रायबरवर आधारलेली असेल. यात 1.0 लिटरचे 3-सिलिंडर नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल आणि 1.0 लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन दिले जाईल. याच बरोबर मॅन्युअल आणि सीव्हीटी दोन्ही गिअरबॉक्स दिले जाऊ शकतात. हिचे काही डिझाईन एलिमेंट आणि फीचर्स निसान मॅग्नाइटकडून घेतले जाऊ शकतात.
Toyota Rumion MPV -
टोयोटाने दोन वर्षांपूर्वी भारतात 'Rumion' नेमप्लेटचा ट्रेडमार्क केला होता. ही 2023 मध्ये लॉन्च होऊ शकते, असे बोलले जात आहे. ही मारुती एर्टिगाचे री-बॅज व्हर्जन असेल. Toyota Rumion MPV मध्ये वेगळ्या पद्धतीने डिझाईन केले गेलेले फ्रंट ग्रिल, हेडलॅम्प आणि नवे रिअर सेक्शन असू शकते. नवी टोयोटा कॉम्पॅक्ट एमपीव्ही मध्ये 1.5 लिटर, 4-सिलिंडर डुअलजेट इंजिन असेल. जे Ertiga तही असते. यात पॅडल शिफ्टर्ससह 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक दिले जाईल.