जेव्हा पती त्याच्या पत्नीला 4.8 कोटींची सुपरकार गिफ्ट करतो...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 02:30 PM2019-06-19T14:30:22+5:302019-06-19T14:32:58+5:30

देश असो वा विदेश पती त्याच्या पत्नीला भेट म्हणून काही ना काही गिफ्ट करतोच, मग ते महागडे नसले तरीही.

When husband give 4.8 crores supercar gift for his wife ... | जेव्हा पती त्याच्या पत्नीला 4.8 कोटींची सुपरकार गिफ्ट करतो...

जेव्हा पती त्याच्या पत्नीला 4.8 कोटींची सुपरकार गिफ्ट करतो...

Next

देश असो वा विदेश पती त्याच्या पत्नीला भेट म्हणून काही ना काही गिफ्ट करतोच, मग ते महागडे नसले तरीही. अनेकदा अशा बातम्या येतात की पतीने त्याच्या पत्नीला महागडी कार गिफ्ट केली. मात्र, आता पतीने पत्नीला सुपरकार भेट दिली आहे. कर्नाटकच्या बंगळुरुमधील एका उद्योजकाने त्याच्या पत्नीला चकचकीत Lamborghini Huracan LP610-4 गिफ्ट केली आहे. या कारची ऑन रोड किंमत 4.8 कोटी रुपये आहे. 


Lamborghini Huracan LP 610-4 च्या एक्स शोरुमची किंमत जवळपास 3.7 कोटी रुपये आहे. आणि हुराकॅनची भारतातील किंमत 3 कोटी रुपयांपासून सुरु होता. मात्र, भेट देण्यात आलेली कार हुराकेनचे एक ताकदवान मॉडेल आहे. यामध्ये ऑल व्हील ड्राईव्ह असल्याने महाग आहे. Huracan चे पहिले मॉडेल RWD सेट अपसह येते. 


Automobili Ardent ने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये पत्नीला पिवळ्या रंगाची लॅम्बॉर्गिनी हुराकेन भेट देण्यात आली आहे. हे सरप्राईज गिफ्ट ला फेमचे कार्यकारी अधिकारी Dr Nilufer Sheriff ने त्यांच्या पत्नीला दिले आहे. 
याआधी एनआरआय व्यक्तीने युएईमध्ये रोल्स रॉयस कुल्लीनान ही कार त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी पत्नीला भेट दिली होती. ही जगातील पहिली महिला आहे की जिच्याकडे तिच्या मालकीची रोल्स रॉयस आहे. 



Lamborghini Huracan बाबत बोलायचे झाले तर ही कार कार्बन फायबर आणि अॅल्युमिनिअमने बनविलेली आहे. हलके बसन असले तरीही ही कार मजबूत आहे. 5.2 लीटरचे व्ही 10 इंजिन देण्यात आले असून 602 बीएचपी ताकद आणि 560 एनएम टॉर्क प्रदान करते. या कारमध्ये तीन ड्रायव्हिंग मोड्स देण्यात आले आहेत. 0 ते 100 किमीचा वेग पकडण्यालाठी या कारला 3 सेंकद लागतात. या कारचे इंजिन 7-स्पीड अॅटोमॅटिक ट्रान्समिशनचे आहे. 

Web Title: When husband give 4.8 crores supercar gift for his wife ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.