जोवर मी मंत्री आहे, तोवर देशात ड्रायव्हरलेस कार येऊ देणार नाही; नितीन गडकरींची प्रतिज्ञा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 13:06 IST2023-12-17T13:06:26+5:302023-12-17T13:06:56+5:30
जगात अनेक ठिकाणी ड्रायव्हरलेस कारची चाचणी केली जात आहे. गुगलसह अनेक मोठ्या कंपन्या ड्रायव्हरलेस गाड्या रस्त्यावर कशा वापरता येतील यावर काम करत आहेत.

जोवर मी मंत्री आहे, तोवर देशात ड्रायव्हरलेस कार येऊ देणार नाही; नितीन गडकरींची प्रतिज्ञा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी ड्रायव्हरलेस कारवर आपली भुमिका स्पष्ट केली आहे. जोवर आपण मंत्री आहे, तोवर ड्रायव्हरलेस कार भारतात येऊ देणार नाही, असा इशाराच गडकरींनी देऊन टाकला आहे.
ड्रायव्हरलेस कार आल्या तर चालकांच्या नोकऱ्या जातील, चालक बेरोजगार होतील अशी भीती गडकरींनी व्यक्त केली आहे. झिरो माईल चर्चासत्रात गडकरी बोलत होते. मला अनेकदा ड्राय़व्हर नसलेल्या सेल्फ ड्राईव्ह कारसाठी विचारणा केली जाते. मी तेव्हाच त्यांना मी जेव्हापर्यंत परिवाहन मंत्री आहे तोवर तुम्ही विसरून जा असे उत्तर देतो, असे गडकरी म्हणाले.
मी बिना चालकवाल्या कार भारतात कधी येऊ देणार नाहीय. कारण यामुळे लोकांच्या नोकऱ्या जातील, यामुळे मी असे होऊ देणार नाही. टेस्लाचे भारतात स्वागत आहे, परंतू चीनमध्ये त्या बनवून भारतात विक्री स्वीकारू शकत नाही, असे गडकरी म्हणाले.
जगात अनेक ठिकाणी ड्रायव्हरलेस कारची चाचणी केली जात आहे. गुगलसह अनेक मोठ्या कंपन्या ड्रायव्हरलेस गाड्या रस्त्यावर कशा वापरता येतील यावर काम करत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने अपघात कमी करता येतील, असा विचार कंपन्यांचा आहे. काही वर्षांपूर्वी युरोपमध्ये अशाच ड्रायव्हरलेस कारचा अपघात चर्चेचा विषय ठरला होता.