लाथ मारेल तिथे...! मारुती ती एकाच झटक्यात महिंद्रा, टाटा, ह्युंदाईला भारी पडली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 12:25 PM2023-08-17T12:25:38+5:302023-08-17T12:26:05+5:30

मारुतीने जुलै महिन्यात एकूण कारची विक्री 1.81 लाख युनिट्स एवढी केली आहे. यामध्ये मारुतीला एसयुव्ही सेगमेंटने मोठा हात दिला आहे.

Where will kick...! Maruti overtake to Mahindra, Tata, Hyundai in one fell swoop in SUV Segment | लाथ मारेल तिथे...! मारुती ती एकाच झटक्यात महिंद्रा, टाटा, ह्युंदाईला भारी पडली

लाथ मारेल तिथे...! मारुती ती एकाच झटक्यात महिंद्रा, टाटा, ह्युंदाईला भारी पडली

googlenewsNext

मारुती ही भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. या कंपनीच्या कारची विक्री आणि इतर कंपन्यांच्या एकूण कारची विक्री ही जवळपास समान आहे. परंतू, एक असे सेगमेंट होते, जिथे मारुतीला काही केल्या यश मिळत नव्हते. परंतू, जुलैमध्ये मारुतीने महिंद्रा, टाटा, ह्युंदाईसारख्या कंपन्यांना पछाडत या सेगमेंटमध्येही एक नंबर पटकावला आहे. 

मारुतीने जुलै महिन्यात एकूण कारची विक्री 1.81 लाख युनिट्स एवढी केली आहे. यामध्ये मारुतीला एसयुव्ही सेगमेंटने मोठा हात दिला आहे. लोकांची छोट्या कारची आवड आता कमी होऊ लागली आहे. यामुळे मारुतीने आपली स्ट्रॅटेजी बदलत Brezza, Grand Vitara, Jimny आणि Fronx अशा एकामागोमाग एक चार एसयुव्ही, एक्सयुव्ही कार लाँच केल्या आणि धमाल उडवून दिली. 

ज्याची जशी मागणी, आवड तशी त्याला कार ही मारुतीची आधीपासूनचीच रणनिती राहिलेली आहे. आता पाच लाखांवर जात असलेली सर्वात छोटी अल्टो कार ही दीड-दोन लाखाला मिळत होती. तेच लोक आता एसयुव्ही घेऊ लागले आहेत. यामुळे मारुतीने या सेगमेंटकडे लक्ष दिले आहे. आता या सेगमेंटमध्ये महिंद्रा, टाटा, ह्युंदाईसारख्या कंपन्या आधीपासूनच आहेत. इथे मारुतीला यश मिळता मिळत नव्हते. परंतू, गेल्या सहा महिन्यांत मारुतीने एकापेक्षा एक अशा चार एसयुव्ही लाँच केल्या आणि या सगळ्या कंपन्यांची हवाच काढून टाकली आहे. 

मारुती सुझुकीने 25% पेक्षा जास्त मार्केट शेअरसह 46,510 UV विकल्या, ज्या 21% मार्केट शेअरसह महिंद्राच्या 35,845 युनिट्सपेक्षा आणि 19% मार्केट शेअरसह Hyundai च्या 32,991 युनिट्सपेक्षा जास्त आहेत. Tata Motors ने जुलै 2023 मध्ये 16% मार्केट शेअरसह 28,147 SUV विकल्या आहेत. 

मारुतीच्या ताफ्यात आता थोड्या थोडक्या नव्हेत तर बलेनो, सेलेरियो, डिझायर, इग्निस, स्विफ्ट, टूर एस आणि वॅगनआर यांचा ताफा आहे. शिवाय Brezza, Ertiga, Fronx, Grand Vitara, Invicto, Jimny, Fronx आणि XL-6 यांचा देखील समावेश आहे. या १५ कार होतात. एवढा ताफा अन्य कोमत्याही कंपनीकडे नाहीय. याचाही फायदा मारुतीला होत आहे. 

Web Title: Where will kick...! Maruti overtake to Mahindra, Tata, Hyundai in one fell swoop in SUV Segment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.