जगातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी कोणती? मारुती, फोक्सवॅगन, फोर्ड की दुसरी कोणती...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 02:04 PM2022-05-31T14:04:00+5:302022-05-31T14:04:27+5:30

गेल्या दोन वर्षांत सर्वच कंपन्यांना कोरोनाचा फटका बसला आहे. तरीदेखील या कंपन्यांनी चांगले प्रदर्शन केले आहे.

Which is the best selling car company in the world? Maruti, Volkswagen, Ford or any other, answer is toyota | जगातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी कोणती? मारुती, फोक्सवॅगन, फोर्ड की दुसरी कोणती...

जगातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी कोणती? मारुती, फोक्सवॅगन, फोर्ड की दुसरी कोणती...

googlenewsNext

जगातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी कोणती असा प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारला तर? काय उत्तर द्याल...फोर्ड, मारुती, फोक्सवॅगन की आणखी कुठली? सलग तीन वर्षे या कंपनीने हा खिताब आपल्या नावे केला आहे. टोयोटाने फोक्सवॅगनपेक्षा एप्रिलमध्ये १० लाख कार जास्त विकल्या आहेत. 

जगावर जपानी आणि जर्मन ब्रँडचे राज्य आहे. टोयोटा ही जपानी कंपनी तर फोक्सवॅगन ही जर्मनीची कंपनी आहे. गेल्या दोन वर्षांत सर्वच कंपन्यांना कोरोनाचा फटका बसला आहे. तरीदेखील या कंपन्यांनी चांगले प्रदर्शन केले आहे.

कोरोनामुळे टोयोटाच्या विक्रीत 5.8 टक्क्यांनी घट झाली, तर फोक्सवॅगनच्या विक्रीत 26 टक्क्यांनी घट झाली. याचा फटका फोक्सवॅगनला बसला आहे. नाहीतर आज फोक्सवॅगन एक नंबरला आणि टोयोटा दोन नंबरला असली असती. टोयोटाने पहिला नंबर मिळविला असला तरी जे लक्ष्य समोर ठेवले होते ते हुकले आहे. कोरोना संकटामुळे एप्रिलमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन ९.१ टक्के कमी झाले. 

दर महिन्याला कंपनीने 7,50,000 वाहनांच्या उत्पादनाचे लक्ष्य ठेवले होते. परंतू, 6,92,259 एवढ्या कार बनविण्यात आल्या. गेल्या वर्षी एप्रिलच्या तुलनेत जागतिक विक्री 11.1 टक्क्यांनी कमी झाल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
 

Web Title: Which is the best selling car company in the world? Maruti, Volkswagen, Ford or any other, answer is toyota

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Automobileवाहन