टाटा पंच, खप खप खपली पण...; २०२२ मधील सर्वाधिक विकली गेलेली कार कोणती, 30 गाड्यांची लिस्ट...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 11:05 AM2023-01-18T11:05:00+5:302023-01-18T11:06:14+5:30
२०२२ मध्ये हॅचबॅक आणि SUV/क्रॉसओव्हर्स/MUV विकल्या गेल्या होत्या. मारुती डिझायर ही एकमेव सेदान टॉप 10 मध्ये होती.
गेल्या वर्षी कोणत्या कार सर्वाधिक विकल्या गेल्या याची आकडेवारी आली आहे. गेल्या वर्षभरात टाटाची दोन कार खूप विकल्या गेल्या आहेत. टाटा पंच तर महिन्याला १०-१२ हजार युनिट एवढ्या विकल्या गेल्या. परंतू, एवढा खप होऊनही टाटाच्या या कारला पहिला नंबर मिळालेला नाही.
२०२२ मध्ये हॅचबॅक आणि SUV/क्रॉसओव्हर्स/MUV विकल्या गेल्या होत्या. मारुती डिझायर ही एकमेव सेदान टॉप 10 मध्ये होती. टाटा टिगोर, ह्युंदाई ऑरा आणि होंडा अमेझ या सेदान कार ३० कारच्या लिस्टमध्ये आहेत. मारुती वॅगन-आर ही भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार होती आणि Nexon ही सर्वाधिक विक्री होणारी SUV/क्रॉसओव्हर होती. 30 मॉडेल्सचा PV मार्केट शेअर 82 टक्के आहे.
मारुती सुझुकीने टॉप 30 च्या यादीत तिच्या 11 मॉडेल्ससह या यादीत स्थान मिळवले आहे. पैकी 7 टॉप 10 मध्ये आहेत. 2021 मध्ये 1,83,851 वॅगन आरचा खप होता, परंतू २०२२ मध्ये 2,17,317 युनिट्सची विक्री झाली. मारुती बलेनो कारची विक्री 8 टक्क्यांनी वाढली. 2022 मध्ये 1,85,665 युनिट्सची विक्री झाली. यानंतर तिसरा नंबर स्विफ्टचा होता. 1,76,424 युनिट्स विकल्या गेल्या.
चौथा नंबर नेक्सॉनचा लागतो. नेक्सॉनने ५४ टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. 1,68,278 युनिट्स विकल्या गेल्या. 2021 ला नेक्सॉन १० व्या नंबरवर होती. अल्टो आणि डिझायर अनुक्रमे 5 आणि 6 वर आहे. ह्युंदाई क्रेटा, मारुती एर्टिगा आणि मारुती ब्रेझा या यादीत टाटा पंच सारखेच आकडे आहेत. टाटा पंचने वार्षिक वर्ष 2022 मध्ये विक्री 475 टक्के वाढून 22,571 युनिट्स वरून 1,29,895 युनिट्सवर गेली. परंतू पंच वर्षाच्या अखेरीला लाँच झाल्याने हा आकडा एवढा वाढला आहे. रशलेनवरून हे आकडे घेतलेले आहेत. पहा लिस्ट...