Alto, Wagon R किंवा Baleno नाही, तर 'ही' आहे सर्वाधिक विकली जाणारी कार, मायलेज 30KM पेक्षा जास्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 18:23 IST2023-08-20T18:23:33+5:302023-08-20T18:23:42+5:30
सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत बलेनो दुसऱ्या क्रमांकावर, वॅगनआर आठव्या क्रमांकावर आणि अल्टो वीसव्या क्रमांकावर आहे.

Alto, Wagon R किंवा Baleno नाही, तर 'ही' आहे सर्वाधिक विकली जाणारी कार, मायलेज 30KM पेक्षा जास्त
नवी दिल्ली : भारतात सर्वाधिक विक्री होणारी कार कोणती? असे विचारल्यावर सहसा बरेच लोक याचे उत्तर अल्टो, वॅगनआर किंवा बलेनोचे नाव घेताना दिसतील. कारण या तिन्ही कार वेगवेगळ्या महिन्यांत सर्वाधिक विकल्या गेल्या आहेत. परंतु, जुलै २०२३ च्या शेवटच्या महिन्यात असे घडले नाही. जुलै महिन्यात मारुती सुझुकी स्विफ्टची सर्वाधिक विक्री झाली आहे. तसेच, सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत बलेनो दुसऱ्या क्रमांकावर, वॅगनआर आठव्या क्रमांकावर आणि अल्टो वीसव्या क्रमांकावर आहे.
मारुती सुझुकी स्विफ्टने जुलै २०२३ मध्ये १७,८९६ युनिट्सची विक्री केली आहे, तर गेल्या वर्षी (२०२२) जुलै महिन्यात एकूण १७, ५३९ युनिट्सची विक्री झाली होती. म्हणजेच विक्रीत वाढ झाली पण फारशी नाही. वार्षिक आधारावर कारची विक्री केवळ २ टक्क्यांनी वाढली आहे. याव्यतिरिक्त, जुलै २०२३ मध्ये, बलेनोच्या १६,७२५ युनिट्स, वॅगनआरच्या १२,९७० युनिट्स आणि अल्टोच्या ७,०९९ युनिट्सची विक्री झाली.
सर्वात विक्री झालेल्या १० कार
मारुती स्विफ्ट - १७,८९६ युनिट्स विक्री
मारुती बलेनो - १६,७२५ युनिट्स विक्री
मारुती ब्रेझा - १६,५४३ युनिट्स विक्री
मारुती एर्टिगा - १४,३५२ युनिट्स विक्री
ह्युंदाई क्रेटा - १४,०६२ युनिट्स विक्री
मारुती डिझायर - १३,३९५ युनिट्स विक्री
मारुती फ्रॉन्क्स - १३,२२० युनिट्स विक्री
मारुती वॅगनआर - १२,९७० युनिट्स विक्री
मारुती नेक्सॉन - १२,३४९ युनिट्स विक्री
मारुती ईको - १२,०३७ युनिट्स विक्री
किंमत किती?
मारुती स्विफ्टची किंमत ५.९९ लाख रुपये ते ९.०३ लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत आहे. यात १.२ लीटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन पेट्रोलवर २३.७६ kmpl आणि सीएनजीवर ३०.९० kmpl पर्यंत मायलेज देते. यात इंजिनसह ५-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सचा पर्याय मिळतो.