वाहनचालन शिकताना इंग्रजी एल अक्षराची लाल रंगातील प्लेट लावणे अत्यावश्यक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 02:00 PM2017-08-24T14:00:00+5:302017-08-24T14:00:00+5:30

वाहन चालवण्यासाठी शिकताना त्या वाहनावर इंग्रजीमध्ये 'एल' हे अक्षर रोमन लिपीमध्ये लाल रंगात असावे. ते का, कसे, नियमानुसार ते कसे लावावे, हे प्रत्येकाने समजून घ्यावे. त्याचा फायदा वाहन शिकताना नक्कीच होतो

while learning car driving holding L plate is essential | वाहनचालन शिकताना इंग्रजी एल अक्षराची लाल रंगातील प्लेट लावणे अत्यावश्यक

वाहनचालन शिकताना इंग्रजी एल अक्षराची लाल रंगातील प्लेट लावणे अत्यावश्यक

googlenewsNext
ठळक मुद्देड्रायव्हिंग शिकताना कारवर इंग्रजी 'एल' अक्षर तयार केलेले वा चितारलेले असावे लागतेशिकणाऱ्या व्यक्तीच्या बाजूला पक्के लायसेन्स असणारी व्यक्ती असावी लागतेकार वा अन्य वाहनामुळे तुम्हाला अन्य वाहनचालकही एकप्रकारे सांभाळून घेत असतात

कार चालवण्यास शिकवण्यासाठी आज विशेष शाळा वा ड्रायव्हिंग स्कूल्स असतात. त्या ठिकाणी असलेल्या कार्समध्ये काही वेगळ्या प्रकारच्या अंतर्बाह्य बदल केलेले असतात. त्यामुळे वाहतुकीमध्ये अन्य वाहनांच्या चालकांना ती कार चालवणारा शिकावू आहे, हे झटकन समजते. ते का समजते, त्यामध्ये असणारा चालक हा ज्या पद्धतीने कार चालवत असतो, त्यावरून नव्हे तर त्या कारवर ड्रायव्हर शिकत आहे किंवा ड्रायव्हिंग स्कूलचे नाव त्यावर रंगवलेले आहे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कारवर पुढे व मागे लाल रंगाच्या स्टिकरमध्ये किंवा लाल रंगाने असलेले इंग्रजी 'एल' अक्षर तयार केलेले वा चितारलेले असते. वाहनचालन शिकवण्यासाठी सर्वच ठिकाणी काही ड्रायव्हिंग स्कूल्स असतात असे नाही, काही जण नावापुरते किंवा सोयीसाठी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जात असतात. अशावेळी त्यांना विशिष्ट दिवस त्या ड्रायव्हिंग स्कूलमधून प्रशिक्षण दिले जाते व त्या ड्रायव्हिंग स्कूलची वाहन शिकावू व्यक्तीला चालवण्यासाठी असलेली कार असते. त्यावर इंग्रजी 'एल' अक्षर तयार केलेले वा चितारलेले असते. पण ज्यावेळी तशी कार असत नाही, स्वतःची कार शिकण्यासाठी वापरीत असेल तर त्यावेळी त्या कारवर इंग्रजी 'एल' अक्षर तयार केलेले वा चितारलेले असावे लागते. किंवा या अक्षराचा स्टिकर लावावा लागतो. तसेच शिकणाऱ्या व्यक्तीच्या बाजूला पक्के लायसेन्स असणारी व्यक्ती असावी लागते. तसे पाहायला गेले तर काहींच्यादृष्टीने ही अतिशयनगण्य बाब असू शकते, एकाधा म्हणतो, त्याची काय गरज आहे. पण एक लक्षात घ्यायला हवे की, या इंग्रजी 'एल' अक्षर तयार केलेले वा चितारलेल्या कार वा अन्य वाहनामुळे तुम्हाला अन्य वाहनचालकही एकप्रकारे सांभाळून घेत असतात, तुमच्यापासून दोन हात लांब राहून का होईना, तुम्हाला एकप्रकारे मदत करीत असतात. लांबून हे इंग्रजी 'एल' अक्षर दिसल्याने वा लक्षात आल्याने वाहतूक पोलीसही तुम्हाला घाई करून जाण्यास सांगत नाही, सांभाळून घेऊन तुम्हाला मार्गदर्शनही करतो.
केवळ कारच नव्हे तर स्कूटर वा मोटारसायकल चालवण्यासाठी तुम्ही ज्यावेळी त्याचे शिक्षण घेत असता त्यावेळी ते स्पष्ट होणे दुसऱ्याला लक्षात येण्यासाठी व तुमच्याही फायद्यासाठी गरजेचे असते. कोणत्याही शिकावू वाहन चालकाने त्याच्या बरोबर पक्के वाहनचालन परवाना असलेल्या व्यक्तीशिवाय वाहन चालवता कामा नये, तसा नियम आहे व कायदाही आहे. परंतु, केवळ त्यासाठी नव्हे तर तुम्हाला वेळप्रसंगी तीच व्यक्ती मदत करू शकते. इतकेच नव्हे तर एल या इंग्रजी अक्षरामुळे तुमच्या बरोबर शिकवणाऱ्या व्यक्तीलाही अन्य वाहनचालक, पोलीस यांचे सहकार्य होते. परस्परांच्या या सहकार्यामधून वाहन चालन शिकणे हे सुकरही बनत असते.
इंग्रजी 'एल' अक्षर कशा आकारात असावे तर 'एल' चा उभा आकार ११ इंच उंच, खालील बाजू साडेसात इंच रूंद, त्या 'एल'ची उजवी बाजू खालील अंगाने उभी- अडीच इंच उंच वरील बाजूवरील रूंदी अडीच इंच रूंद असे असावे. हे एल अक्षर पांढऱ्या रंगाच्या पत्र्यावर लाल रंगामध्ये चितारलेले असावे. नियमानुसार हे जरी असले तरी आज काही वाहनांवर शिकावू चालक हे स्टिकरचा वापर करीत असतात. नियमात ते नाही, पण त्याचा वापर करू दिला जातो, हे वाहतूक पोलिसांचे सौजन्यच असते, हे लक्षात घ्यावे.

Web Title: while learning car driving holding L plate is essential

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.