लाडक्या मारुतीचा मूळ मालक कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 08:35 AM2018-12-03T08:35:33+5:302018-12-03T11:18:58+5:30

देशभरात मारुती सुझुकीचे चाहते बरेच आहेत. पण यापैकी बऱ्याचजणांना मात्र या कंपनीचा मूळ मालक कोण आहे हेच माहिती नसेल.

who is the original owner of the Maruti moters? | लाडक्या मारुतीचा मूळ मालक कोण?

लाडक्या मारुतीचा मूळ मालक कोण?

googlenewsNext

मुंबई : देशभरात मारुती सुझुकीचे चाहते बरेच आहेत. अर्थातच तेवढा मारुतीच्या कारचा खपही आहे. पण यापैकी बऱ्याचजणांना मात्र या कंपनीचा मूळ मालक कोण आहे हेच माहिती नसेल. खासगी कार ही चैनीची गोष्ट असणाऱ्या काळात ही कंपनी उभी राहिली. 1962 मध्ये कारची मागणीही प्रचंड होती. यामुळे वेटिंग पिरिएड हा तब्बल 2 वर्षे होता. अशा काळात मारुती उद्योगाने भरारी घेतली आणि देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली. 

संजय गांधी यांनी रोल्स रॉयस मोटर्स या ब्रिटिश कंपनीत १९६४-१९६७ अॅप्रेंटीशीप पूर्ण केली आणि ते भारतात परतले. भारतात आल्यावर त्यांनी कार बनविण्य़ासाठी दिल्लीमध्ये एक लहान वर्कशॉप उभे केले. दोन मानसे कामाला होती. अशातच इंदिरा गांधी सरकारने कार निर्मिती करण्यासाठी परवाना देण्यास तयारी सुरु करताच संजय गांधी यांनी मारुती मोटर्स लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली. हरियाना जवळची २९७ एकर जागा कंपनी उभी करण्यासाठी घेण्यात आली. या कंपनीमध्ये 5000 गाड्या बनविण्याचा परवाना मिळाला खरा पण या निर्णयावरून इंदिरा गांधी यांना मोठी टीका सहन करावी लागली. 


यानंतर आणीबाणी आणि 1977 मध्ये जनता पार्टीच्या सरकारने मारुतीची लावलेली चौकशी, आयोग आदींमुळे मारुतीची स्थापना जरी झालेली असली तरीही गाडी काही पुढे सरकली नव्हती. 1980 मध्ये इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या. अशातच एका दुर्दैवी विमान अपघातात संजय गांधी यांचे (२३ जून १९८०) अकाली निधन झाले आणि त्यांचे स्वप्न इंदिरा गांधी यांनी पूर्ण केले. 


खूप प्रयत्नांनंतर २ ऑक्टोबर १९८२ मध्ये भारत सरकार,"मारुती कंपनी आणि सुझुकी कंपनी" यांच्या मध्ये गाडी निर्मितीसाठी संयुक्त करार झाला. डिसेंबर 1983 मध्ये SUZUKI SS 80 ही पहिली कार बनविण्यात आली. या कारला मारुती ८०० असे नाव देण्यात आले. 

Web Title: who is the original owner of the Maruti moters?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.