कारला कॅरियर कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 04:37 PM2017-08-02T16:37:53+5:302017-08-02T16:39:00+5:30

लांबच्या प्रवासामध्ये कारमध्ये असणारे अधिक सामान वाहून नेण्यासाठी रुफ रॅक वा कॅरियरचा वापर केला जातो. अतिशय उपयुक्त असणारी ही वस्तू काहीवेळा मात्र कारच्या आरेखनाची सोभा घालवते तर कधी एरोडायनॅमिक रचनेलाच छेद देते.

 Why Carla Carrier? | कारला कॅरियर कशाला?

कारला कॅरियर कशाला?

Next

लांबच्या प्रवासाला जायचे असले की, पहिली काळजी केली जाते ती कारमधून इतके सामान न्यायचे तरी कसे, कारमध्ये ते मावेल की नाही, ते सुरक्षितपणे कसे नेता येईल... अशा प्रश्नांना उत्तर शोधण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करीत  असतो. मुळात प्रवासी कार ही साधारणपणे हॅचबॅक, सेदान वा एसयूव्ही असली तरी त्यामध्ये सामान ठेवण्यासाठी डिक्की बूटस्पेस असते. ती तशी पुरेशी असते. अर्थात काहीवेळा मोठ्या आकारमानाचे सामान तेथे राहात नाही व मग सुरू होते कारला कॅरियर किंवा रूफ लगेज असले तर बरे झाले असते. खरे म्हणजे सध्याच्या कारची रचना वा आरेखन पाहाता रुफ कॅरेज, वा कॅरियर वा रूप रेक या प्रकारामुळे कारचा शो निघून जातो. अनेकजणांना ते स्वीकारवतही नाही. बूटसेपेस भरपूर  असल्याने त्याची गरजही भासत नाही. १९७०च्या सुमारास कारला वरच्या बाजूला पावसाचे पाणी जाण्यासाठी एक घळीसारखी जागा तयार केली गेली होती. मग त्या जागेवर रेल किंवा एक आकर्षक अशी पट्टी बसवण्याची रचना केली गेली, त्यामुळे त्या पट्टीवर आधारलेली कॅरियर, रेक वा लगेज बॉक्स लावता येईल, अशी कल्पना पुढे आली. सामान नेण्यासाठी ही जागा अतिशय सुरेख होती, हे जरी खरे असले तरी ते सामान नीट बांधावे लागते. काहीवेळा लांबच्या प्रवासामध्ये त्याची चिंता असते, सामान नीट आहे की नाही, ते पडणार नाही ना, वळणावर कारचा त्यामुळे समतोल जात नाही ना... अशा प्रश्नांमुळे खरे म्हमजे या कॅरियर्सना लावण्याचे धाडस किमान शहरातील लोक करीत असल्याचे फार दिसून येत नाही. 

कारची एरो डायनॅमिक अशी रचना सध्या बहुतांशी मोटारींमध्ये केलेली असल्याने अशा प्रकारची कॅरियर्स लावणे हेच त्या एरो डायनॅमिक आकाराला छेद देणारी बाब आहे. तरीही काहीजण छतावर  असलेल्या रेलींगवर कॅरियर्स लावतात. एसयूव्ही, हॅचबॅक या प्रामुख्याने टुरिस्ट मोटारी म्हणून वापर करायला लागल्यापासून व त्यापूर्वीच्या टॅक्सींनाही ही कॅरियर्स लावली जात होती, त्यामुळे वैयक्तिक वापरामधील मोटारींनाही अनेकांना कॅरियर्स बसवणे गरजेचे वाटते. लोखंड, अॅल्युमिनियम, स्टील इतकेच नव्हे तर फायबर बॉक्सचाही वापर या रूफ लगेजमध्ये होतो. यामध्ये प्रामुख्याने फायबर बॉक्सचा आकर्षक असला तरी त्याचा वापर फार मोठ्या प्रमाणात भारतात होताना दिसत नाही. अन्य प्रकारची ही कॅरियर्स म्हणजे एका प्रकारचा चौकोनी खोलगट भाग जो सामान राहाण्यासाठी आकार असलेला, छतावर लावलेला दिसतो. यामध्ये जागा भरपूर असली तरी ते सामान नीटपणे बांधून घेतलेले उत्तम असते. सहजपणे ती काढा घालण्यासाठीही असलेली मिळू लागली आहेत. दरवाजांवर एका पट्टीद्वारे  बसवण्यात येतात. नटबोल्डद्वारे ते काम केले जाते. पण हे करताना कारच्या त्या ठिकाणच्या रंगाची काळजी घ्यावी लागते. काही  असले तरी कॅरियर लावणे आज तरी शहरांमध्ये नित्याने वापरल्या जाणाऱ्या मोटारींवर अशी कॅरियर वा रूफ लगेज लावणे पसंत केले जात नाही. उपयुक्तता यादृष्टीने ही कॅरियर्स नक्कीच चांगली आहेत. कारला दिल्या जाणाऱ्या रेलींगलाच जोडता येतील अशी ही कॅरियर्स उपलब्ध असल्याने त्याकारची शोभा जरी गेली तरी कारच्या बॉडीला लावलेल्या रंगावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नसते. अर्थात एक उपयुक्त सामग्री म्हणून जरी त्याकडे पाहिले तरी ती वापरताना काळजी घेणे गरजेचे  असते. विशेष लांबच्या प्रवासात त्यावरील सामान नीट बांधणे, अति हलके सामान त्यावर न ठेवणे, आकाराने मोठे तसेच अतिवजनी सामानही त्यावर न ठेवणे इतकी काळजी घेतली तरी रूफ रॅक वापरणे सुरक्षित ठरू शकते.

Web Title:  Why Carla Carrier?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.