महिंद्राच्या XUV 400 EV ला एवढा वेळ का लागतोय? आणखी आठ फिचर्स देणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 04:31 PM2023-08-03T16:31:27+5:302023-08-03T16:32:18+5:30
गेल्या काही वर्षांपासून चर्चा जरी असली तरी प्रत्यक्षात काही ही कार रस्त्यावर येऊ शकलेली नाहीय. आता या कारबाबत आणखी एक चर्चा सुरु झाली आहे.
महिंद्रा ही देशातील सर्वाधिक एसयुव्ही कार विकणारी कंपनी आहे. इतर कार कंपन्यांच्या ताफ्यात छोट्यापासून मोठ्यापर्यंत कार आहेत. महिंद्राच्याही होत्या परंतू, त्यांना काही त्यात जम बसविता आला नाही यामुळे त्या बंद झाल्या. आता महिंद्रा कॉम्पॅक्ट एसयुव्ही ते मोठ्या एसयुव्हीपर्यंत कार विकते. अशातच महिंद्रा SUV 400 इलेक्ट्रिक बाजारात आणणार आहे. गेल्या काही वर्षांपासून चर्चा जरी असली तरी प्रत्यक्षात काही ही कार रस्त्यावर येऊ शकलेली नाहीय. आता या कारबाबत आणखी एक चर्चा सुरु झाली आहे.
SUV 400 ईव्हीमध्ये महिंद्रा आणखी काही फिचर्स देण्याची तयारी करत आहे. कंपनीकडून यात 8 नवीन फीचर्स जोडण्यात येणार आहेत. ESP, HSA, ऑटो डिमिंग IRVM, क्रूझ कंट्रोल आणि TPMS सारखी फिचर्स असतील. चार स्पीकर असलेले दोन ट्विटर्स आणि फॉग लॅम्प्स आणि बूट लॅम्प्सही देण्यात येतील.
कंपनी पॅनोरमिक सनरूफ सारखे फीचर्स देण्यासही तयार आहे. टाटाच्या नेक्सॉन इलेक्ट्रिकशी या एसयुव्हीला स्पर्धा करावी लागणार आहे. दोन्ही कार या गॅसोलिनवर फाईव्ह स्टार सेफ्टीरेटिंगच्या आहेत. या इलेक्ट्रिक कारमध्ये दोन बॅटरी पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामध्ये एक बॅटरी 34.5 kW ची आहे. तर दुसरी बॅटरी 39.4 kW ची आहे. ही कार एका चार्जमध्ये 375 आणि 456 किलोमीटरपर्यंत धावू शकते.