बाईक बंद केल्यानंतर इंजिनाच्या दिशेने टिक टिक आवाज का येतो? हे आहे कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 18:01 IST2025-02-01T18:01:27+5:302025-02-01T18:01:57+5:30
बाईक चालविल्याने तापते, ती थंड होताना असा आवाज येत असावा असा सर्वांचा समज आहे. अनेकांना तो आवाज पहिल्यांदा ऐकल्यावर पण काही गडबड नाहीय ना असे वाटते.

बाईक बंद केल्यानंतर इंजिनाच्या दिशेने टिक टिक आवाज का येतो? हे आहे कारण...
बाईक चालवून आल्यानंतर पार्क केली की इंजिनच्या दिशेने सारखा टिक-टिक असा आवाज येत राहतो. तो आवाज कशामुळे येतो हे अनेकांना माहिती नसते. बाईक चालविल्याने तापते, ती थंड होताना असा आवाज येत असावा असा सर्वांचा समज आहे. अनेकांना तो आवाज पहिल्यांदा ऐकल्यावर पण काही गडबड नाहीय ना असे वाटते.
मोटरसायकली ज्या आहेत त्यातून हा आवाज येतो. हा आवाज इंजिनमधून नाही तर सायलेंसरमधून जो भाग इंजिनला जोडलेला असतो तिथून येतो. जेव्हा इंजिन थंड होऊ लागते तेव्हा हा आवाज येत असतो. इंजिन थंड झाले की आवाजही थंड होऊन जातो.
बाईक खूप वेळ चालविली की सायलेन्सर गरम होतो. तेव्हा त्यातील पाईप देखील तापतो आणि प्रसरण पावतो. थंड होताना हा पाईप पुन्हा आकसायला सुरुवात होते. या प्रक्रियेवेळी हा टिकटिक आवाज येत असतो. आताच्या बाईकना हानीकारक वायू, धूराचे कण हवेत सोडले जाऊ नयेत म्हणून कॅटेलिक कन्व्ह्रर्टर येतो. हा कन्व्हर्टरही तापल्याने प्रसरण पावलेला असतो. तो थंड होताना पुन्हा मूळ जागी येत असतो, त्याचाही आवाज टिक टिक असा येतो.
जुन्या बाईक असतील तर त्यात हा आवाज येत नाही. साधारण १०-१२ वर्षांपूर्वीच्या बीएस ३ पासूनच्या बाईकना हा आवाज येतो. यामुळे हा आवाज आला तर घाबरून जायचे कारण नाही. ही एक सामान्य प्रक्रिया आहे. असा आवाज आला तर कनेक्शन सुरु आहे का, काही पार्ट चालू राहिला का किंवा गाडीमध्ये काही समस्या आहे का असे प्रश्न मनात आणू नका.