‘ऑटोपायलट’ कार खड्डेमय रस्त्यांवर धावेल का?; वाहन उद्योगाची कमाल पण, भारतात कठिणच स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 08:08 AM2021-07-28T08:08:12+5:302021-07-28T08:08:32+5:30

आसपासच्या वस्तू, वाहन वा व्यक्तीचा अंदाज घेऊन कार डाव्या किंवा उजव्या बाजूला वळते. समोर काही असेल तर कार आपोआप थांबते. 

Will the ‘autopilot’ car run on potholes roads ?; is a difficult situation in India | ‘ऑटोपायलट’ कार खड्डेमय रस्त्यांवर धावेल का?; वाहन उद्योगाची कमाल पण, भारतात कठिणच स्थिती

‘ऑटोपायलट’ कार खड्डेमय रस्त्यांवर धावेल का?; वाहन उद्योगाची कमाल पण, भारतात कठिणच स्थिती

Next

कार स्वत:च चालवायची, साधारणत: अशीच सर्वांची धारणा असते. मात्र, आता स्वयंचलित गाड्याही, म्हणजे ऑटोपायलट, रस्त्यावर धावू लागल्या आहेत. त्याचे अप्रूप आहेच. परंतु आता या गाड्या भारतातही दिसू लागण्याची शक्यता आहे. टेस्ला या कंपनीने ही ऑफर दिली आहे. 

ऑटोपायलट कार चालते कशी?

जेथे जायचे आहे तेथील जीपीएस लोकेशन आणि अवकाशातील सॅटेलाइटची मदत घेतली जाते. त्यानंतर कारचा मार्ग ठरतो.

आव्हाने...

अपघाताच्या प्रसंगात अनेकदा ड्रायव्हरलाही कारवर नियंत्रण मिळवता येते असे नाही.  हीच बाब ऑटोपायलट कारलाही लागू आहे. त्यामुळे कंपन्या पूर्णपणे सुरक्षित प्रवास करता यावा, असे सॉफ्टवेअर बनवण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहेत. भारतात वाहतूक नियमांबाबत असलेली कमी जागरुकता, रस्त्यांची खराब स्थिती, वाहतूक व्यवस्थेवरील वाढता ताण आणि वाहतूक कोंडीच्या समस्या आदी कारणांमुळे ऑटोपायलट तंत्रज्ञानावर चालणाऱ्या कार वापरणे सध्यातरी तितके सोपे ठरणार नाही.

आसपासच्या वस्तू, वाहन वा व्यक्तीचा अंदाज घेऊन कार डाव्या किंवा उजव्या बाजूला वळते. समोर काही असेल तर कार आपोआप थांबते. मार्गातील अडथळे किंवा आसपासची स्थिती समजून घेत ऑटोपायलट कार स्वत:चा वेग वाढवू वा कमी करू शकते. सेन्सर्सच्या मदतीने कार स्वत:ची मार्गिका निवडून त्याप्रमाणे धावते. सेन्सर्समुळेच कारला सिग्नलही समजतात.

मानवाचा ड्रायव्हिंगमध्ये जाणारा वेळ वाचेल
मानवी चुकांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण घटू शकेल. अशा कार कॅब म्हणून वापरता येतील. सार्वजनिक व्यवस्थेचे पर्याय वाढतील. संकटकाळात अशी कार तातडीने मिळू शकेल.

ऑटोपायलट गाड्यांचे वैशिष्ट्य काय?

कार स्वत: चालवायची नाही.
ती स्वत:च चालते. 
ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला आपण फक्त बसायचे.

Web Title: Will the ‘autopilot’ car run on potholes roads ?; is a difficult situation in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Automobileवाहन