शेतकऱ्यांचे निम्मे पैसे वाचणार; नितीन गडकरी उद्या देशातील पहिले CNG ट्रॅक्टर लाँच करणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 05:16 PM2021-02-11T17:16:09+5:302021-02-11T17:22:56+5:30

cng tractor to be launched tomorrow : नितीन गडकरी उद्या संध्याकाळी पाच वाजता देशातील पहिले सीएनजी फिटेड ट्रॅक्टर लॉन्च करणार आहेत.

Will save farmers half their money; Nitin Gadkari to launch country's first CNG tractor tomorrow! | शेतकऱ्यांचे निम्मे पैसे वाचणार; नितीन गडकरी उद्या देशातील पहिले CNG ट्रॅक्टर लाँच करणार!

शेतकऱ्यांचे निम्मे पैसे वाचणार; नितीन गडकरी उद्या देशातील पहिले CNG ट्रॅक्टर लाँच करणार!

Next
ठळक मुद्देसीएनजी एक स्वच्छ इंधन आहे, ज्यामुळे कार्बन आणि इतर प्रदूषित कण फार कमी उत्सर्जित होतात.सीएनजी ट्रॅक्टर आल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासही मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींपासून आता शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. स्कूटर, कार आणि बसेसनंतर आता सीएनजी बसविण्यात आलेले ट्रॅक्टरही रस्त्यावर आणि शेतात फिरताना दिसणार आहेत. 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उद्या संध्याकाळी पाच वाजता देशातील पहिले सीएनजी फिटेड ट्रॅक्टर लॉन्च करणार आहेत. यावेळी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर, रस्ते वाहतूक व महामार्ग राज्यमंत्री व्ही.के. सिंह आणि राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला उपस्थित राहणार आहेत. (indian first ever cng tractor to be launched tomorrow farmers will get big benefits in farming)

असे होतील फायदे..
रावमेट टेक्नो सोल्यूशन्स आणि टोमॅसेटो अचिली इंडियाद्वारे (Rawmatt Techno Solutions and Tomasetto Achille India) सीएनजी बसविण्यात आलेल्या ट्रॅक्टरचा फायदा शेतकऱ्यांना होईल. आता सीएनजी ट्रॅक्टर आल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासही मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

सीएनजी एक स्वच्छ इंधन आहे, ज्यामुळे कार्बन आणि इतर प्रदूषित कण फार कमी उत्सर्जित होतात. नवीन तंत्रज्ञानाद्वारे रूपांतरित सीएनजी इंजिनचे आयुष्य पारंपारिक ट्रॅक्टरपेक्षा जास्त असेल. डिझेलच्या तुलनेत सीएनजी ट्रॅक्टरचे मायलेज खूप जास्त असेल. एवढेच नाही तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज चढ-उतार होत असतात, या तुलनेत सीएनजीच्या चढ-उतारांच्या किंमती खूप कमी असतात.

स्वस्त आहे सीएनजी
पेट्रोल किंवा डिझेलपेक्षा सीएनजी खूप स्वस्त आहे. सीएनजी टँक टाइटपासून सील असल्यामुळे रिफ्यूलिंगच्यावेळी स्फोट होण्याचे प्रमाण कमी असते. वेस्ट टू वेल्थ म्हणजेच कचऱ्यापासून मौल्यवान वस्तू बनविण्याच्या पर्यायाला पुढे आणखी बळकटी मिळते. पेंढ्यांचा वापर बायो सीएनजी तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो, ज्यामुळे केवळ शेतकऱ्यांचे उत्पन्नच वाढत नाही तर पेंढ्या जाळल्यामुळे होणारे प्रदूषण कमी होण्यासही मदत होईल.

सीएनजी ट्रॅक्टरांमुळे असेही होतील फायदे
काही स्डटीनुसार, डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टरांच्या तुलनेत सीएनजी ट्रॅक्टर्संना जास्त पॉवर मिळते. डिझेलच्या तुलनेत सीएनजीपासून 70 टक्के कमी उत्सर्जन होते. सीएनजी ट्रॅक्टर वापरल्याने शेतकऱ्यांचा इंधन खर्च 50 टक्क्यांनी कमी होण्यास मदत होईल. समजा, राजधानी दिल्लीत डिझेलची किंमत प्रतिलिटर 78.03 रुपये आहे, तर सीएनजी  42.70 रुपये प्रति किलो आहे.
 

Web Title: Will save farmers half their money; Nitin Gadkari to launch country's first CNG tractor tomorrow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.