आश्चर्य...KTM ची सीट नसलेली स्कूटर; उभे राहून चालवायची...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 11:41 AM2019-02-12T11:41:31+5:302019-02-12T11:45:15+5:30
सीट नसलेल्या स्कूटरचा कधी विचारही केला नसेल पण केटीएमने अशी स्कूटर प्रत्यक्षात आणली आहे. महत्वाचे म्हणजे ही स्कूटर इलेक्ट्रीक असणार आहे.
धूम बाईकमध्ये भारतात धुमाकूळ घातलेल्या KTM या कंपनीने अफलातून प्रयोग केला आहे. सीट नसलेल्या स्कूटरचा कधी विचारही केला नसेल पण केटीएमने अशी स्कूटर प्रत्यक्षात आणली आहे. महत्वाचे म्हणजे ही स्कूटर इलेक्ट्रीक असणार आहे.
केटीएमच्या या इलेक्ट्रिक स्कूटरला नुकतेच ट्रायल घेताना पाहिले गेले आहे. जी आपल्या वेगळ्या लूकसाठी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या स्कूटरमध्ये खास बात म्हणजे या स्कूटरला उभे राहून चालवावे लागणार आहे. या स्कूटरला कंपनीने व्हाईट आणि ब्ल्यू या रंगांच्या मिलाफात दाखविले आहे. पुढील बाजुला मोठे चाक तर मागील बाजुला छोटेसे चाक लावण्यात आले आहे.
उजव्या बाजुला एक बेल्ट असून तो एनर्जी रिकव्हरी प्रणालीशी जोडलेला असतो. तसेच फुल्ली डिजिटल TFT इंस्ट्रुमेंट क्लस्टर हँडल बारवर जोडलेला आहे. हा डिस्प्ले कलर डिस्प्लेही असण्याची शक्यता आहे जो केटीएम 390 ड्यूक मध्ये आहे.
केटीएमच्या या बाईकमध्ये बॅटरी चपटी वापरण्यात आल्याची शक्यता असून ती फ्लोअर बोर्डमध्ये असण्याची शक्यता आहे. जशी हार्ले डेव्हिडसनच्या स्कूटरमध्ये पाहायला मिळाले होते. इलेक्ट्रीक मोटर मागील चाकाच्या डाव्या बाजुला देण्यात आली आहे. मात्र, ही स्कूटर भारतात येण्याची शक्यता कमीच आहे.
केटीएम जरी इलेक्ट्रीक वाहनांमध्ये येत नसली तरीही 2013 मध्ये टोकियो मोटर शोमध्ये स्पीड दाखविण्यात आली होती, जीने खूप प्रसिद्धीही मिळविली होती. केटीएमने ई-स्पीडला खासकरून शहरी कॉम्प्यूटर बाईक म्हणून लाँच केले होते. झिरो इमिशन करणाऱ्या या स्कूटरमध्ये पावरफूल इलेक्ट्रीक मोटर आहे. जे 15 पीएसची ताकद आणि 36 एनएमचा टॉर्क प्रदान करते.
ई स्पीडची टॉप स्पीड 80 किमी आहे. फुल चार्ज केल्यावर ती 64 किमी धावते. 4.36 कीलोवॉटची बॅटरी देण्यात आली असून पूर्ण चार्ज करण्यासाठी दोन तासांचा वेळ लागतो. दोन्ही चाकांना 220 एमएमचे डिस्क ब्रेक लावलेले आहेत.
भारतात येत्या काळात इलेक्ट्रीक वाहनांचे पर्व सुरु होणार आहे. यासाठी केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. यासाठी केंद्र सरकारने योजनाही आणली आहे.
केवळ 30 रुपयांत 22 किमी चालवा इलेक्ट्रीक कार; पंतप्रधान मोदींची मंजुरी