जगातील सर्वात महागडी कार, किंमत ऐकूण तुम्हाला धक्काच बसेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 04:21 PM2022-05-20T16:21:34+5:302022-05-20T16:22:21+5:30
world most valuable car mercedes benz 1955 model : ही कार 1955 ची एक मर्सिडीज-बेंझ (Mercedes-Benz) आहे.
नवी दिल्ली : जगातील सर्वात महागड्या कारची किंमत किती असू शकते, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? ऑडीपासून बीएमडब्ल्यू किंवा फेरारीपर्यंत, तुम्ही लक्झरीपेक्षा लक्झरी कारचा विचार करून पाहा. तुम्ही फक्त 2 कोटी किंवा 20 कोटींच्या कारचा विचार करू शकाल. पण आज आम्ही तुम्हाला अशा कारबद्दल सांगणार आहोत, ज्याची किंमत तुमच्या विचारापेक्षा अधिक आहे.
ही कार 1955 ची एक मर्सिडीज-बेंझ (Mercedes-Benz) आहे आणि तिची किंमत 14.3 कोटी डॉलर (1109 कोटी रुपये) आहे. अशा प्रकारे ही जगातील सर्वात महागडी कार आहे. या कारची लिलाव करणारी कंपनी आरएम सोथेबीचे (RM Sotheby) म्हणणे आहे की, मर्सिडीज बेंझच्या रेसिंग डिपार्टमेंटने अशा फक्त दोनच कार बनवल्या होत्या आणि तिच्या निर्मात्याच्या नावावरून रुडॉल्फ उहलेनहॉट (Rudolf Uhlenhaut) असे नाव दिले होते.
या कारचे नाव Mercedes-Benz 300 SLR Uhlenhaut Coupé आहे. या कारचे मॉडेल एका खासगी कलेक्टरने विकत घेतले आहे. विशेष प्रसंगी ही कार सार्वजनिक प्रदर्शनासाठी उपलब्ध करून देईल, असे आश्वासन त्यांनी कंपनीला दिले असले, तरी या कारचे दुसरे मॉडेल अद्याप मर्सिडीज-बेंझकडेच असेल आणि कंपनीच्या संग्रहालयाची शोभा वाढवत राहील.
फेरारीपेक्षा तीन पटीने महाग
एएफपीच्या वृत्तानुसार, ही कार RM Sotheby ने लिलावासाठी ठेवली होती. 5 मे रोजी जर्मनीतील मर्सिडीज-बेंझ कार संग्रहालयात जगातील काही क्लासिक कारचा लिलाव करण्यात आला होता. या मर्सिडीज कारची किंमत 1962 च्या Ferrari 250 GTO पेक्षा जवळपास तिप्पट आहे, जी पूर्वी जगातील सर्वात महागडी कार होती. फेरारीचे हे 1962 मॉडेल 4.8 कोटी डॉलरमध्ये (सुमारे 372 कोटी रुपये) विकण्यात आले होते.