अरे बापरे! ही आहे जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट, या किंमतीत आल्या असत्या 4,500 गाड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 11:37 AM2018-04-10T11:37:08+5:302018-04-10T11:37:08+5:30
वाहनांचे एकाहून एक मॉडेल्स बाजारात येत असतानाच त्यांना शोभेशी नंबर प्लेट असावी यासाठी फॅन्सी नंबर प्लेटची क्रेझ सगळीकडेच आहे.
नवी दिल्ली - वाहनांचे एकाहून एक मॉडेल्स बाजारात येत असतानाच त्यांना शोभेशी नंबर प्लेट असावी यासाठी फॅन्सी नंबर प्लेटची क्रेझ सगळीकडेच आहे. गाडीच्या नंबर प्लेटसाठी तुम्ही किती रुपये मोजाल ? 500, 1 हजार, 2 हजार ? चला फार फार तर पाच-एक हजार मोजाल. पण तुम्हाला कदाचित ऐकून आश्चर्य वाटेल, पण ब्रिटन सरकारने एका गाडची नंबर प्लेट विक्रीसाठी ठेवली आहे. त्या नंबर प्लेटची किंमत 132 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. या किंमतीमध्ये मारुती सुझूकी अल्टोच्या 4,500 गाड्या आल्या असत्या. या आधी 1904 ते 2008 पर्यंत ही नंबर प्लेट शहाराच्या महापौरांकडे होती. त्यानंतर खान डिझायनरेचे मालक अफझल यांनी ही नंबर प्लेट 10.5 कोटी रुपयांना विकत घेतली होती. त्यांच्या अलिशान बुगाटी कारवर ही नेमप्लेट होती.
युकेमधील अनेकांकडे अशा काही परवाना असलेल्या नंबरप्लेट्स आहेत ज्या ते लिलावात विकू शकतात. त्यानं UK’s Regtransfers मार्फत ही नंबरप्लेट विक्रीसाठी ठेवली आहे. ही युकेमधील सर्वात मोठी आणि अधिकृत नंबरप्लेट्सची विक्री करणारी वेबसाईट आहे. अनेक सेलिब्रिटींनी आपल्या अलिशान गाड्यांच्या नंबरप्लेट्स इथून विकत घेतल्या आहेत.
माध्यमांच्या वृत्तानुसार, ब्रिटनमधल्या अफझल खान नावाच्या व्यक्तीनं आपल्या अलिशान गाडीवरील नंबरप्लेट चक्क 132 कोटी रुपयांना विक्रीसाठी ठेवली आहे. या प्लेटची मूळ किंमत जवळपास 110 कोटी रुपये आहे. त्यावर कर असल्यानं एकूण 132 कोटी रुपये मोजून संग्राहकाला ती विकत घेता येणार आहे. पिवळ्या रंगाच्या पट्टीवर ‘F1’ असं लिहिलेल्या या प्लेटची जर विक्री झालीच तर जगातील सर्वाधिक किंमतीत विकली गेलेली ही नंबरप्लेट ठरेल.