पहिल्या उडणाऱ्या कारची जगाला उत्सुकता; लाँचपूर्वीच 800 बुकिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 07:41 PM2018-09-10T19:41:21+5:302018-09-10T19:45:27+5:30

आजच्या वाहतूक कोंडीच्या दिवसात काही वेळात 2 तास लागणारे अंतर कापता आले तर किती छान वाटेल ना! Samson Sky या कंपनीची उडती कार हे स्वप्न पूर्ण करणार आहे.

The world's first flying car's Curiosity; 800 bookings before launch | पहिल्या उडणाऱ्या कारची जगाला उत्सुकता; लाँचपूर्वीच 800 बुकिंग

पहिल्या उडणाऱ्या कारची जगाला उत्सुकता; लाँचपूर्वीच 800 बुकिंग

Next

नवी दिल्ली : आजच्या वाहतूक कोंडीच्या दिवसात काही वेळात 2 तास लागणारे अंतर कापता आले तर किती छान वाटेल ना! Samson Sky या कंपनीची उडती कार हे स्वप्न पूर्ण करणार आहे. या कारने लाँच होण्यापूर्वीच एक विक्रम केला आहे. लाँचिंगपूर्वीच 800 जणांनी ही उडती कार बूक केली आहे. यावरून या नव्या प्रकारच्या कारमध्ये लोकांना असलेला रस दिसून येतो.


महत्वाचे म्हणजे या कारला जगभरातून मागणी आहे. 24 देशांतील ग्राहकांनी ही कार बूक केली आहे. यात 46 ग्राहक एकट्या अमेरिकेचे आहेत. या उडत्या कारचे नाव Switchblade आहे. ही कार हवेतून उडण्यासोबत रस्त्यांवरूनही धावू शकणार आहे. 


समोर आलेल्या माहितीनुसार ही कार 305 किमी प्रती तास एवढ्या वेगात उडू शकते. या कारमध्ये 2 जण बसू शकतात. दिसण्यामध्ये ही कार छोट्या विमानासारखी दिसते. या कारला पंखही दिले आहेत. या कारचा उतरतानाचा वेग 201 तर सर्वाधिक वेग 257 किमी प्रती तास असणार आहे. 


इंजिन : या स्विचब्लेड कारमध्ये 4 सिंलिंडरचे इंजिन बसविण्यात आले असून ते 190 अश्वशक्ती ताकद निर्माण करते. महत्वाचे म्हणजे या कारला उडण्यासाठी 1100 फुटांची सपाट जागा लागते, तर उतरण्यासाठी 1600 फुटांची जागा लागते.

Web Title: The world's first flying car's Curiosity; 800 bookings before launch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.