सिंगल चार्जमध्ये 1200Km ची रेंज देईल ही इलेक्ट्रिक कार, किंमत केवळ ₹3.47 लाख; संपूर्ण देश बघतोय वाट!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 12:41 AM2023-12-07T00:41:50+5:302023-12-07T00:42:22+5:30

महत्वाचे म्हणजे, या इलेक्ट्रिक कारचे प्री-सेल्स देखील सुरू झाले आहे.

xiaoma small electric car range 1200km on a single charge price just rs 3 47 lakh | सिंगल चार्जमध्ये 1200Km ची रेंज देईल ही इलेक्ट्रिक कार, किंमत केवळ ₹3.47 लाख; संपूर्ण देश बघतोय वाट!

सिंगल चार्जमध्ये 1200Km ची रेंज देईल ही इलेक्ट्रिक कार, किंमत केवळ ₹3.47 लाख; संपूर्ण देश बघतोय वाट!

इलेक्ट्रिक फोर व्हीलरच्य बाबतीत भारतीय बाजारात झपाट्याने वाढ होत असतानाच, पुढील केवळ दीड वर्षाच्या आत भारतीय बाजार सर्वात स्वस्तातली कार येईल, जिची रेंज जवळपास 250Km असेल, असे नुकतेच टाटा मोटर्सने म्हटले आहे. मात्र यातच, चिनी बाजारात फर्स्ट ऑटो वर्क्सने (FAW) मायक्रो-ईव्ही सेगमेन्टमध्ये आपली गुंतवणूक वाढविण्याची योजना आखली आहे. यासाठी कंपनीने बेस्ट्यून ब्रांडअंतर्गत शाओमा (Xiaoma) स्मॉल इलेक्ट्रिक लॉन्च केली आहे.

महत्वाचे म्हणजे, या इलेक्ट्रिक कारचे प्री-सेल्स देखील सुरू झाले आहे.  FAW बेस्ट्यून शाओमाची स्पर्धा थेट वुलिंग होंगगुआंग मिनी EV सोबत असेल. ही कार सध्या चीनमध्ये सर्वाधिक विकली जाणारी मायक्रो कार आहे. बेस्ट्यून शाओमाची किंमत 30,000 ते 50,000 युआन (जवळपास 3.47 लाख ते 5.78 लाख रुपये) एवढी आहे.

बेस्ट्यून शाओमाची रेंज -
बेस्ट्यून शाओमा FME प्लॅटफॉर्मवर बेस्ड आहे. या कारला ईव्ही आणि रेन्ज एक्सटेंडर डेडिकेटेड चेसिस देण्यात आली आहे. यापूर्वी NAT नावाची राइड-हेलिंग EV याच प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली होती. FME प्लॅटफॉर्ममध्ये A1 आणि A2 असे दोन सब-प्लॅटफॉर्म आहेत. ईव्हीची रेंज 800Km, तर एक्सटेंडरची रेन्ज 1200Km हून अधिक आहे. दोन्ही प्लॅटफॉर्म 800 V आर्किटेक्चरला सपोर्ट करतात.

मिळतील एअरोडायनॅमिक व्हील -
शाओमा डुअल-टोन कलर स्किममध्ये उपलब्ध आहे. शाओमाला एरोडायनामिक व्हील देण्यात आल्या आहेत. ज्या रेंज वाढविण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. हिला मागच्या बाजूला टेल लॅम्प आणि बंपर सेम थीमचे आहेत.

Web Title: xiaoma small electric car range 1200km on a single charge price just rs 3 47 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.