Yamaha ची नवी स्पेशल कॅशबॅक ऑफर; कोरोना वॉरिअर्सनाही स्कूटरवर मिळणार फायदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 14:39 IST2021-07-09T14:37:13+5:302021-07-09T14:39:17+5:30
Yamaha Special Cashback Offer: Yamaha मोटर्स इंडियानं फ्रन्टलाईन वर्कर्सना सन्मान देण्यासाठी ग्रॅटीट्यूट बोनसची केली घोषणा. यामाहाच्या स्कूटर्सवर मिळणार फायदा.

Yamaha ची नवी स्पेशल कॅशबॅक ऑफर; कोरोना वॉरिअर्सनाही स्कूटरवर मिळणार फायदा
Yamaha मोटर्स कंपनीला ६६ वर्षे पूर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर Yamaha मोटर्स इंडियानं (YMI) फ्रन्टलाईन वर्कर्सना सन्मान देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीनं ग्रॅटिट्यूड बोनस देण्याची घोषणा केली असून कंपनीच्या Fascino 125 Fi आणि Ray ZR 125 Fi च्या खरेदीवर कंपनी ५ हजार रूपयांच्या कॅशबॅकची ऑफर देत आहे. फ्रन्टलाईन वर्कर्समध्ये मेडिकल स्टाफ, सॅनिटेशन वर्कर्स, पोलीस आणि लष्कर, तसंच पालिकांच्या कर्मचाऱ्यांच्या समावेश आहे.
यामाहा मोटर्स इंडिया ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष Motofumi Shitara यांनी यामाहाच्या कर्मचाऱ्यांसह, डीलर पार्टनर, सप्लायर्स आणि ग्राहकांकडून मिळालेल्या मदतीचं समर्थन केलं. तसंच त्यांच्या विश्वासामुळेच कंपनीला आत्मविश्वासानं प्रगती करण्याची आणि कठीण काळात व्यवसाय करता आला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. Motofumi Shitara यांनी फ्रन्टलाईन वर्कर्सप्रति आभारही व्यक्त केले.
सर्व दुचाकींमध्ये ब्लूटूथ
गेल्या महिन्यात यामाहा इंडियानं FZ-X मॉडेल लाँच करण्यासोबतच आपल्या आगामी रिवॅम्प प्लॅनबाबतही खुलासा केला. भारतात यामाहाचे टू व्हिलर्समध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हीटी, साईड स्टँड इंजिन कट ऑफदेखील मिळणार आहे. सध्या स्टार्ट स्टॉप टेक्नॉलॉजीच स्कूटर्सपर्यंत मर्यादित असेल. स्कूटर्सबाबत सांगायचं झालं तर कंपनी लवकरच Fascino सोबत Ray-ZR 125 मॉडेल्स लाँच करणार आहे. कंपनीनं 125cc स्कूटर्सला गेल्या महिन्यात लाँच केलं होतं. Fascino मध्ये मोठ्या प्रमाणात अपग्रेड मिळणार आहे. यामध्ये हायब्रिड टेक्नॉलॉजीसह नव्या इंजिनचाही समावेश आहे.