Pulsar, Apache आणि KTM Duke पेक्षा 'लई भारी'; पाहताच क्षणी 'या' बाईकच्या प्रेमात पडाल...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 06:55 PM2023-03-09T18:55:44+5:302023-03-09T18:58:24+5:30
स्पोर्ट्स बाईकची आवड असणाऱ्यांसाठी ही बातमी कामाची आहे. जाणून घ्या बाईकची किंमत...
Yamaha Bike : स्पोर्टी बाईकची आवड असणाऱ्यांसाठी Yamaha पहिली पसंत असते. Yamaha कडे एकापेक्षा एक जबरदस्त स्पोर्टी गाड्या आहेत. यातच Yamaha ची MT-15 बाईक लॉन्च झाल्यापासून खूप लोकप्रिय झाली आहे. तरुणांमध्ये या बाइकची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. कंपनीने आपल्या 2023 मॉडेलमध्ये काही बदलांसह नवीन रंग पर्यायही दिले आहेत. कंपनीने यात नवीन स्विंगआर्म, अधिक प्रीमियम अपसाइड-डाउन फॉर्क्स, एक नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि नवीन रंग आणला आहे. नवीन RDE नियमांनुसार या बाईकचे इंजिनदेखील अपडेट केले आहे. भारतीय बाजारपेठेत या बाईकची थेट टक्कर बजाज पल्सर, टीव्हीएस अपाचे, केटीएम ड्यूक यांसारख्या बाईकशी आहे.
अनेक स्मार्ट फीचर्सनी सुसज्ज बाइक
बाईकला आता ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम, एलईडी इंडिकेटर आणि ड्युअल-चॅनल एबीएस मिळतात. बाईकमध्ये 155cc इंजिन आहे, जे 18.4 PS पॉवर आणि 14.1 Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकचे मायलेज सुमारे 56.87 kmpl आहे. मात्र, या बदलानंतर कंपनीने या बाईकची किंमत वाढवली आहे. त्यामुळे तुम्हाला आता या बाईकसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. या बाईकची किंमत 1.97 लाख(एक्स शोरुम मुंबई) पासून सुरू होते.
काय आहेत नवीन एमिशन नॉर्म्स??
सरकारने ठरवलेल्या नवीन उत्सर्जन नियमांनुसार, कार उत्पादकांना त्यांचे विद्यमान मॉडेल नवीन नियमांनुसार अपडेट करावे लागतील. जर एखाद्या कारचे इंजिन नवीन नियमांनुसार तयार केले नाही तर ते मॉडेल बंद केले जाईल. अहवालानुसार, मारुती सुझुकी, महिंद्रा, होंडा, स्कोडा, रेनॉल्ट, ह्युंदाई सारख्या कंपन्यांचे काही मॉडेल नवीन नियमांचे पालन करू शकत नाहीत. यामुळे कंपन्या हे मॉडेल्स बंद करतील. त्याचप्रमाणे अनेक दुचाकी वाहनेही बंद करण्यात येणार आहेत.