Yamaha MT 15 vs Suzuki Gixxer SF : किंमत, स्टाईल आणि मायलेजमध्ये कोणती स्पोर्ट्स बाईक शानदार? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 02:12 PM2022-08-06T14:12:43+5:302022-08-06T14:13:24+5:30

Yamaha MT 15 vs Suzuki Gixxer SF : Yamaha MT 15 2.0 आणि Suzuki Gixxer SF आहेत. या दोन्ही बाईकच्या किंमतीपासून ते फीचर्स आणि स्पेसिफिकेशनपर्यंत संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या...

Yamaha Mt 15 Vs Suzuki Gixxer Sf Which Is Better Sports Bike In Price Style And Mileage Know Here | Yamaha MT 15 vs Suzuki Gixxer SF : किंमत, स्टाईल आणि मायलेजमध्ये कोणती स्पोर्ट्स बाईक शानदार? जाणून घ्या...

Yamaha MT 15 vs Suzuki Gixxer SF : किंमत, स्टाईल आणि मायलेजमध्ये कोणती स्पोर्ट्स बाईक शानदार? जाणून घ्या...

googlenewsNext

नवी दिल्ली : टू-व्हीलर सेक्टरमधील बाईक सेगमेंट कमी बजेटच्या बाईक्सपासून ते महागड्या प्रीमियम बाईक्सपर्यंतची एक मोठी रेंज पाहायला मिळते. ज्यामध्ये आज आम्ही 150 सीसी सेगमेंटमध्ये येणाऱ्या स्पोर्ट्स बाईकबद्दल बोलत आहोत. जर तुम्हाला 150 सीसी सेगमेंटची स्टायलिश आणि वेगवान बाईक घ्यायची असेल, तर या सेगमेंटच्या दोन बाईक्सबद्दल जाणून घ्या, ज्या त्यांच्या डिझाइन, फीचर्स आणि स्पीडमुळे लोकांना आवडतात. या बाईकच्या तुलनेमध्ये Yamaha MT 15 2.0 आणि Suzuki Gixxer SF आहेत. या दोन्ही बाईकच्या किंमतीपासून ते फीचर्स आणि स्पेसिफिकेशनपर्यंत संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या...

Yamaha MT 15
यामाहा एमटी 15 (Yamaha MT 15) बाईक आपल्या सेगमेंटमधील एक लोकप्रिय बाईक आहे, ज्यामध्ये कंपनीने 155 cc चे सिंगल सिलिंडर इंजिन दिले आहे. हे 18.4 PS पॉवर आणि 14.1 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. बाईकच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की, ही बाईक 56.87 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये कंपनीने तिच्या पुढच्या आणि मागील दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक लावले आहेत, ज्यात सिंगल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे. Yamaha MT 15 ची सुरुवातीची किंमत 1.64 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे, जी टॉप व्हेरिएंटमध्ये गेल्यावर 1.65 लाखांपर्यंत जाते.

Suzuki Gixxer SF
सुजुकी जिक्सर एसएफ (Suzuki Gixxer SF) ही एक स्पोर्ट्स बाईक आहे, जी तिच्या स्टायलिश डिझाईन आणि स्पीडमुळे लोकांना आवडते. कंपनीने आतापर्यंत या बाईकचा एकच व्हेरिएंट बाजारात आणला आहे. इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने सिंगल सिलिंडर 155 सीसी इंजिन बसवले आहे, जे एअर-कूल्ड फ्युएल इंजेक्टेड टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. हे इंजिन 13.6 PS पॉवर आणि 13.8 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसह 5 स्पीड ट्रान्समिशन दिलेले आहे.

ब्रेकिंग सिस्टीममध्ये कंपनीने पुढच्या आणि मागील दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक लावले आहेत. या ब्रेकिंग सिस्टीमसह कंपनीने सिंगल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम दिली आहे. मायलेजबाबत सुझुकी कंपनीचा दावा आहे की, ही सुझुकी जिक्सर एसएफ 48.54 किलोमीटरचे मायलेज देते. हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. सुझुकी जिक्सर एसएफची सुरुवातीची किंमत 1,37,100 रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरू आहे. मात्र ऑन रोड 1.65,109 रुपयांपर्यंत जाते.

Web Title: Yamaha Mt 15 Vs Suzuki Gixxer Sf Which Is Better Sports Bike In Price Style And Mileage Know Here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.