Yamaha ने लाँच केल्या धमाकेदार बाईक्स, KTM-Triumph ला देणार टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 02:31 PM2023-12-16T14:31:15+5:302023-12-16T14:31:58+5:30
ग्राहक बराच वेळ या दोन्ही बाईकची वाट पाहत होते.
नवी दिल्ली : दिग्गज दुचाकी उत्पादक कंपनी यामाहा मोटार इंडियाने (Yamaha Motor India) अखेर Yamaha R3 आणि Yamaha MT-03 लाँच केली आहे. ग्राहक बराच वेळ या दोन्ही बाईकची वाट पाहत होते. Yamaha R3 बद्दल बोलायचे झाले तर, ही बाईक यापूर्वी देखील भारतात विकली गेली होती. आता ही बाईक 4.64 लाख रुपयांच्या किंमतीत (एक्स-शोरूम) लाँच झाली आहे.
Yamaha MT-03 ची एक्स-शोरूम किंमत 4.59 लाख रुपये आहे. ही बाईक पहिल्यांदाच भारतात दाखल झाली आहे. कंपनीने या दोन्ही बाईक सीबीयू रुटद्वारे भारतात आणणार आहे. त्यामुळे किमतीच्या दृष्टीने या बाईक बऱ्यापैकी महाग आहेत. डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, Yamaha R3 ही बाईक R15 सारखी दिसते. दुसरीकडे, MT-03 ची डिझाईन Yamaha MT-15 सारखी दिसते.
Yamaha R3 : डिझाईन
Yamaha R3 मध्ये ड्युअल एलईडी हेडलॅम्पसह फुल फेअरिंग डिझाइन मिळते. बाईकचे वजन 169 किलो आहे. तसेच, सीटची उंची 780 मिमी आहे. या बाईकला पुढील बाजूस अपसाइड-डाउन फोर्क आणि मागील बाजूस मोनोशॉक सेटअप मिळेल. ब्रेकिंगसाठी दोन्ही बाजूला डिस्क ब्रेक्स आणि ड्युअल चॅनल एबीएस मिळतील.
Yamaha R3 : इंजिन
Yamaha R3 च्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर या बाईकला 321cc लिक्विड कूल्ड पॅरलल ट्विन इंजिनची पॉवर मिळते. या बाईकमध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स आहे. तर फीचर्समध्ये एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असणार आहे. मात्र, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी मिळणार नाही.
Yamaha MT-03 : स्पेसिफिकेशन्स
Yamaha MT-03 ची डिझाईन MT-15 सारखी नेकेड आहे. यामध्ये अग्रेसिव्ह स्टाईल फ्यूल टँकसह एलईडी हेडलॅम्प आहे. तसेच, Yamaha R3 प्रमाणे, यातही पुढील बाजूस अपसाइड-डाउन फोर्क्स आणि मागील बाजूस मोनोशॉक आहेत. MT-03 चे चेसिस आणि इंजिन R3 स्पेसिफिकेशन्स प्रमाणेच आहेत. याबाईकमध्ये 321cc पॅरेलल ट्विन इंजिन पॉवर देण्यात आले आहे. तसेच, 6 स्पीड गिअरबॉक्स मिळेल.
मार्केटमध्ये टक्कर कोणाला देणार?
Yamaha R3 भारतीय बाजारपेठेत KTM RC 390 ला टक्कर देऊ शकेल. Yamaha MT-03 च्या एंट्रीमुळे KTM Duke 390 आणि Triumph Speed 400 चे टेन्शन वाढू शकतो.