90 च्या दशकातील लोकप्रिय Yamaha RX100 बाईक नव्या अवतारात लाँच होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 01:30 PM2023-01-24T13:30:02+5:302023-01-24T13:30:47+5:30

Yamaha Rx100 : रिपोर्ट्सनुसार, कंपनीने यामाहा RX 100पुन्हा बाजारात लाँच करण्यातबाबत याआधीही संकेत दिले आहेत.

Yamaha Rx100 Can Be Launched With Bs6 Engine And Hi Tech Features Read Complete Details | 90 च्या दशकातील लोकप्रिय Yamaha RX100 बाईक नव्या अवतारात लाँच होणार?

90 च्या दशकातील लोकप्रिय Yamaha RX100 बाईक नव्या अवतारात लाँच होणार?

googlenewsNext

नवी दिल्ली : 90 च्या दशकात तरुणांमध्ये यामाहा आरएक्स 100(Yamaha RX100) बाईक लोकप्रिय होती. बाईकची डिझाइन, स्पीड आणि कमी वजनामुळे खूप पसंत होती, परंतु काही वर्षांपूर्वी कंपनीने या बाईकचे उत्पादन बंद केले आहे. पण, आता ही बाईक नवीन इंजिन आणि फीचर्ससह पुन्हा लाँच करण्याचा कंपनीचा विचार आहे.

रिपोर्ट्सनुसार, कंपनीने यामाहा RX 100पुन्हा बाजारात लाँच करण्यातबाबत याआधीही संकेत दिले आहेत. ज्यामध्ये यामाहा इंडियाचे प्रमुख इशिन चिहाना यांनी या बाईकच्या वापसीबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनीकडे यामाहा RX 100 पुन्हा लाँच करण्याची योजना आहे, ज्यावर काम सुरू आहे.

जर कंपनीने ही बाईक पुन्हा बाजारात आणली तर डिझाइन तशीच असेल, पण जुन्या इंजिनसह या बाईकचे परत येणे अशक्य आहे.  यामाहा RX100 मध्ये उपलब्ध असलेले इंजिन 2 स्ट्रोक इंजिन आहे, जे BS6 मानकांची पूर्तता करत नाही, त्यामुळे यामाहाला या बाईकचे इंजिन अपडेट करावे लागेल.
 
रिपोर्ट्सनुसार, या बाईकमध्ये मिळणाऱ्या 2 स्ट्रोक इंजिनऐवजी कंपनी या बाईकमध्ये सिंगल सिलिंडर 4 स्ट्रोक इंजिन देऊ शकते, जे BS6 मानक असेल.  बाईकचा आकार आणि वजन लक्षात घेता कंपनी या बाईकमध्ये 97.2  सीसी इंजिन देऊ शकते, जे 11 एचपी पॉवर आणि 10.39 एनएम पीक टॉर्क जनरेट करू शकते.  या इंजिनसोबत 4 स्पीड गिअरबॉक्स दिला जाऊ शकतो.

कसे असेल डिझाईन?
यामाहा RX 100 च्या डिझाईन आणि लूकच्या संदर्भात आलेल्या रिपोर्ट्सनुसार, कंपनी ही बाईक त्याच डिझाईनमध्ये परत आणणार आहे, जी आधी मिळाली होती. परंतु या डिझाइनमध्ये काही कॉस्मेटिक अपडेट जोडले जाऊ शकतात.  याशिवाय, बाईकमध्ये सर्व एलईडी दिवे वापरले जाऊ शकतात, ज्यात एलईडी हेड लाईट, एलईडी टेल लाईट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प आणि डीआरएल देखील दिले जाऊ शकतात.

काय असतील फीचर्स?
बाईकमधील फीचर्सबद्दल सांगायचे तर, यामध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, डिजिटल स्पीडोमीटर आणि डिजिटल ट्रिप मीटर यामध्ये दिले जाऊ शकतात.  याशिवाय, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, यूएसबी चार्जिंग पॉईंट यांसारखे लेटेस्ट फीचर्स मिळतील अशी शक्यता आहे.

जाणून घ्या, ब्रेकिंग सिस्टीम...
ब्रेकिंग सिस्टीम बद्दल बोलायचे झाले तर कंपनी ही बाईक दोन वेरिएंटसह लाँच करू शकते, ज्यामध्ये डिस्क आणि ड्रम ब्रेक्स व्यतिरिक्त, दोन्ही चाकांवर ड्रम ब्रेकसह एक व्हेरिएंटचा समावेश केला जाऊ शकतो. सस्पेन्शन सिस्टीममध्ये बाईच्या फ्रंटच्या टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि रिअरमध्ये 5 टाइम अॅडजस्टेबल शॉक अब्जॉर्बरला बसवले जाऊ शकतात.

कधी होईल लाँच?
कंपनीने अद्याप यामाहा RX 100 च्या लाँच संदर्भात कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. पण रिपोर्ट्सनुसार, ही बाईक 2025 मध्ये 1 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह लाँच केली जाऊ शकते.

Web Title: Yamaha Rx100 Can Be Launched With Bs6 Engine And Hi Tech Features Read Complete Details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.